नंदुरबार ! प्रतिनिधी
महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी बालाजी क्षिरसागर, शाहूराज मोरे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसिलदार उल्हास देवरे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कोविड संकटाच्या काळात चांगली कामगिरी केली आहे. यापुढेही आपले कामकाज अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करावा, असे यावेळी श्रीमती खत्री यांनी सांगितले.
या कार्यक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयातील रमेश चौधरी, शरद जाधव, अनिता दौंड, अविनाश खोरणे, राहुल निकुंभे, कन्हैय्या पवार यांचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातून चांगली कामगिरी करणाऱ्या अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसिलदार मंदार कुलकर्णी, नायब तहसिलदार रमेश वळवी, संदीप परदेशी, चुडामण सरगर, महेंद्र गावीत, अशोक डोईफोडे, अझरोद्दीन काझी, गुलाब शिरसाठ, कविता बारी, जाधव सखाराम ठाकरे यांनादेखील पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.








