नंदुरबार ! प्रतिनिधी
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार 7 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 9.00 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम. रविवार 8 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 9.00 वाजता शासकीय विश्रामगृह येथून वाहनाद्वारे प्रयाण. सकाळी 9.15 वा. नंदुरबार येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीद्वारे आयोजित ‘व्यर्थ न हो बलिदान’ कार्यक्रमास उपस्थिती व हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांना अभिवादन व स्वातंत्र्य सैनिकांच्या सत्कार कार्यक्रमास उपस्थिती. संपर्क-दिलीप नाईक (9422791037) जिल्हा काँग्रेस कमिटी नंदुरबार, श्वनायकराव देशमुख, समन्वयक ‘व्यर्थ न हो बलिदान’ (मो.नं. 9455555695)
सकाळी 11.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड आढावा बैठक. संपर्क-निवासी उपजिल्हाधिकारी नंदुरबार. नंदुरबार जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकाऱ्यांची आढावा बैठक. संकर्प-जिल्हा कार्यक्रम अधिकारी नंदुरबार. (स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार) दुपारी 12.30 वा. शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व राखीव. दुपारी 1.30 वा. शासकीय वाहनाने अमरावतीकडे प्रयाण.