नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील बजरंग नगरातील एका अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील बजरंग नगरात राहणारी एक १४ वर्षीय मुलगी कोणास काहीएक न सांगता निघून केली. ती अद्यापपावेतो परत आली नाही. याबाबत मुलीच्या नातेवाईकांनी शहादा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील पोहेकॉ.तपास अशोक कोळी करीत आहेत.