Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेतकऱ्यांना प्रिपेड विज मिटर नको, शासनाने आधी महाराष्ट्र भारनियमन मुक्त करुन दाखवा, शरद जोशी विचारमंच संघटनेची मागणी

team by team
May 3, 2022
in राज्य
0
शेतकऱ्यांना प्रिपेड विज मिटर नको, शासनाने आधी महाराष्ट्र भारनियमन मुक्त करुन दाखवा, शरद जोशी विचारमंच संघटनेची मागणी

नंदुरबार l प्रतिनिधी
शासनाने पहिले महाराष्ट्र भारनियमन मुक्त करुन दाखवावा, मग बाकीच्या वल्गना कराव्यात, कृषिसाठी प्रिपेड मिटर म्हणजे शेतकऱ्यांची यातून फार मोठी होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना प्रिपेड मिटर नको, अशी मागणी शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एम.जी.राजपूत व जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकादवारे केली आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात असे म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकार 12/12/2012 ला महाराष्ट्र भारनियमन मुक्त करणार होते त्याचे काय झाले? याचे उत्तर महाविकास आघाडी सरकारने आधी दयावे त्यानंतर कृषिपंपासाठी प्रिपेड मिटर येणार वगैरेच्या घोषणा कराव्यात. राज्य सरकारने शेती व कृषिपंपाला विजेचा पुरवठा करण्यास अकार्यक्षमता दर्शविली आहे. शेतकऱ्यांकडून बेकायदेशीरपणे वसुल केलेले 22 हजार कोटी, 29 हजार कोटीं रुपयांची आगाऊ कपात ही खोटी व फ्राड आहे. विज बिलांच्या घोटाळयाच्या संदर्भामध्ये चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे. याबाबत कोणीही काहीही बोलायला तयार नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे निराकरण करणे आवश्यक आहे. मुळ विषयांना बगल देऊन प्रिपेड मिटर आदी. गोष्टी पुढे आणल्या जात आहेत. प्रिपेड मिटर दवारे शेतकऱ्यांना लुटण्याचा डाव सरकार आखत आहे. राज्य सरकारने दिलेल्या 16 तासांच्या अनुदानामधील 22 हजार कोटी व शेतकऱ्यांच्या कृषि पंपाच्या वीज बिलांमधील 29 हजार कोटी रुपयांचा घोटयाळयाची सर्वप्रथम चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दयावेत. पंजाबमध्ये पहिल्या आठ दिवसांत आम आदमी पार्टी शेतकऱ्यांना कृषि पंपासाठी वीज मोफत देत आहे. घरगुती कनेक्शनसाठी 200-300 युनिटपर्यंत विज मोफत दिली जात आहे. शेतकऱ्यांसाठी पाण्याची सोय केली जात आहे. मग या सरकारला गेल्या 50 वर्षामध्ये केवळ शेतकऱ्यांना शेतीसाठी नियमित विजपुरवठा देता आलेला नाही. भारनियमनमुक्त महाराष्ट्र करता आलेला नाही.त्यामुळे आघाडी शासनाने पहिले भारनियमनमुक्त महाराष्ट्र करुन दाखवावा,अशी मागणी करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

गर्भपाताची औषधे ऑनलाईन विक्री करणाऱ्या ॲमेझॉन विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

Next Post

अल्पवयीन मुलीस पळविले, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
अल्पवयीन मुलीस पळविले, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीस पळविले, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add