Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

देहली प्रकल्पात गेलेल्या घरांच्या घसारा पोटी दोन कोटी रुपयांचा निधी धनादेशाद्वारे वाटप

team by team
May 4, 2022
in राज्य
0
देहली प्रकल्पात गेलेल्या घरांच्या घसारा पोटी  दोन कोटी रुपयांचा निधी धनादेशाद्वारे वाटप

खापर l प्रतिनिधी

गेल्या 40 वर्षा पासुन रखडत असलेल्या देहली प्रकल्पाच्या कामाला जानेवारी महिन्यात सुरु करण्यात आले होते, मात्र विविध प्रकारच्या समस्या न सुटल्याने झालेले घळ भरणीचे अंतिम टप्प्यातील काम हे पुन्हा प्रकल्प ग्रस्तांनी गेल्या आठवड्यात दि. 26 एप्रिल 2022 रोजी बंद पाडले होते. त्यामुळे प्रकल्प ग्रस्ताकरिता तातडीने बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली होती. आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या आदेशानुसार आंबाबारी या गावात देहली प्रकल्पात गेलेल्या घरांच्या घसारा पोटी सानुग्रह अनुदान आज अक्षय तृतीयेचे मुहूर्तावर दोन कोटी पाच लाख 80 हजार 247 रुपयांचा निधी धनादेशाद्वारे वाटप करण्यात आले. धनादेश जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती रतन पाडवी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
देहली प्रकल्पात गेलेल्या घरांचा घसारा पोटी सानुग्रह अनुदान वाटप कार्यक्रम आंबाबारी गावातील जिल्हा परिषद शाळेत संपन्न झाले, यावेळी बैठकीचे अध्यक्ष स्थानि जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती रतन पाडवी हे होते, प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती अक्कलकुवा उपसभापती विजय पाडवी, जिल्हा परिषद सदस्य सी. के. पाडवी, प्रताप वसावे, जितेंद्र पाडवी, पंचायत समिती सदस्य नानसिग वळवी, आंबाबारी सरपंच चंदूलाल तडवी, गुलीउंबर सरपंच आनन्द वसावे, खडकुणा सरपंच गुलाबसिंग वसावे, गव्हाळी सरपंच जगण वसावे, दरबारसिग पाडवी, गेबु वसावे, नारायण तडवी, सहाय्यक अभियंता श्रेणी 1 किशोर पावरा, शाखा अभियंता विकास शिंदे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आर. आर. खर्चे, सेवादल काँग्रेस तालुका अध्यक्ष जेहरसिग वळवी, रवींद्र वसावे, राजेंद्र वळवी आदी उपस्थित होते. प्रकल्पग्रस्तांनी यावेळी आपली कैफियत मान्यवरांच्या पुढे ठेवले व लवकरच शंभर टक्के लाभार्थ्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा देखील केलेली आहे, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, देहली प्रकल्पाचे काम हे प्रकल्प ग्रस्तांचे योग्य पुनर्वसन व अन्य कारणांमुळे गेल्या 40 वर्षापासुन रखडलेले प्रश्न देहली प्रकल्प ग्रस्तांच्या अनेक मागण्या अद्याप पर्यंत अपुर्ण राहिल्याने त्या आदिवासी विकास विभागाचे मंत्री ऍड. के. सी. पाडवी यांच्या अथक प्रयत्नांतून तात्काळ पूर्ण केले जाणार आहे. लवकर जण सुविधेचे कामदेखील पूर्ण करण्यात येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पाण्याची समस्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी सुटणार आहे, शेती सुजलाम-सुफलाम होणार आहे. यासाठी लाभार्थ्यांनी व प्रशासनाचे आपला ताळमेळ बसवणे हे गरजेचे आहे. प्रकल्पग्रस्त यांच्या घरांच्या घसारा पोटी सानुग्रह अनुदान 692 लाभार्थ्यांना दोन कोटी पाच लाख 80 हजार 247 रुपयांचा धनादेश लाभार्थ्यांना स्वीकार करावा असे आवाहन करत आपल्या भाषणातून सांगितले. यावेळी प्रकल्पग्रस्त दाखला मिळण्याकरिता 692 लाभार्थ्यांना भूसंपादन मिळण्यासाठी नोटिसा बजावण्यात आले. यावेळी सहाय्यक अभियंता स्रेणी 01 किशोर पावरा यांनी अहवाल सादर केला, तर जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे यांनी सूत्रसंचालन केले तर दरबारसिग पाडवी यांनी आभार मानले

राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी देहली प्रकल्पात गेलेल्या घरांच्या घसारा पोटी सानुग्रह अनुदान बाबत झालेल्या बैठकीत दूरध्वनीवरून संपर्क साधून 692 लाभार्थ्यांनी दोन कोटी पाच लाख 80 हजार 247 रुपये स्वीकार करावा अशी विनंती केली, व ज्या लाभार्थ्यांना भूसंपादनाच्या, रहिवासाचा करिता प्लॉट, तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था, पाण्याची समस्या, आदी व्यवस्था लवकरच पूर्ण करण्यात येईल आणि प्रकल्पाच्या कामाला गती देण्यास मदत करावी, अशी विनंती करत काम लवकरच पूर्ण करण्याची ग्वाही देखील दिली. यावेळी प्रकल्पग्रस्तांनी समाधानाचा श्वास घेतला व पुढील कारवाईस आम्ही सामोरे जाऊ असे आश्वासनही दिले.

बातमी शेअर करा
Previous Post

अल्पवयीन मुलीस पळविले, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

वाहनाची दुचाकीला धडक, दोघांना दुखापत

Next Post
अल्पवयीन मुलीस पळविले, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

वाहनाची दुचाकीला धडक, दोघांना दुखापत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add