Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

औरंगाबाद खंडपीठाने खून प्रकरणात आरोपीतांना जामीन केला मंजूर

team by team
May 2, 2022
in क्राईम
0
औरंगाबाद खंडपीठाने खून प्रकरणात आरोपीतांना जामीन केला मंजूर

नंदुरबार l प्रतिनिधी
फिर्यादी दिलीप एल. पाडवी, रा. भूलाने, ता शहादा, यांनी आरोपी भावसिंग डी. भिल व इतर ४ सर्व रा. भूलाने, ता. शहादा यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन शहादा येथे भा.द.वि. कलम ३०२, ३०७, ३२४, ५०४, ५०६ व ३४ प्रमाणे नोंदविला होता. थोडक्यात माहिती अशी की, फिर्यादी व इतर लोकांनी आरोपी यांची मुलगी हिच्या लग्नासाठी फिर्यादीच्या मामेभाऊ चा मुलगा याच्यासाठी मागणी केली होती. परंतु आरोपीने मुलीचे लग्न दुसरीकडे केले होते. म्हणून वेळोवेळी वाद होत होता. घटनेच्या दिवशी आरोपी हे फिर्यादी यांच्या घरी आले होते. आरोपींच्या हातात लोखंडी गज, लाकडी दांडके व चेन असे प्राणघातक शस्त्रे होती. मुलगा विवाहित मुलीला फोन करून त्रास का देतो व इतर कारणास्तव म्हणून शिवीगाळ करुन मारामारीचे प्रकार झाले होते. मारून टाकण्याची धमकी दिली होती. आरोपी हे घटनास्थळातून पसार झाले होते. फिर्यादी व दुखापती यांना म्हसावद येथे सरकारी दवाखान्यात पाठविले होते. सर्वजण उपचार करून बरे वाटत असल्याने गावी परत आले होते. नंतर बरे वाटत नसल्याने परत खाजगी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी सरकारी दवाखान्यात पाठवल्यानंतर मयत घोषित केले होते. दि. २६ ऑगस्ट २०२० रोजी सर्व आरोपी त्यांना अटक करण्यात आली होती. आरोपीतांनी सत्र न्यायालय शहादा येथे जामीन अर्ज दोन वेळा दाखल केला होता. परंतु सत्र न्यायालय शहादा यांनी सदर आरोपीतांचा जामीन अर्ज नामंजूर करण्याचे आदेश पारित केले होते. सदर आदेशाविरुद्ध आरोपीतांनी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे फौजदारी जामीन अर्ज क्रमांक १५३/२०२२ ॲड. गजेंद्र देविचंद जैन (भंसाली) यांच्या मार्फत दाखल केला होता. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद ( न्यायमूर्ती एम. जी. शेवलीकर) यांनी दि. १४ मार्च २०२२ रोजीच्या आदेशान्वये आरोपीतांना अटी व शर्ती सह जामीन मंजूर करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश पारित केले.आरोपी तर्फे ॲड. गजेन्द्र देवीचंद जैन (भंसाली) यांनी काम पाहिले.

बातमी शेअर करा
Previous Post

आमलाड येथे महाराष्ट्रदिन उत्साहात साजरा

Next Post

उमर्दे येथील कृषी तंत्र विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

Next Post
उमर्दे येथील कृषी तंत्र विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

उमर्दे येथील कृषी तंत्र विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add