नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील जावदे तर्फे हवेली येथील बसस्थानकाजवळ असलेली टपरी काढण्याच्या कारणावरुन दोघांना हातोडीने मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील जावदे तर्फे हवेली येथील काशिनाथ रुपचंद निकुंभ यांचे पुतणे गोरख निकुंभ यांनी बसस्थानकाजवळ असलेली टपरी काढून घ्यावी. या कारणावरुन काशिनाथ रुपचंद निकुंभ यांना विलास दिलीप निकुंभ याने लोखंडी हातोडीने उजव्या डोळ्याखाली मारुन दुखापत केली. तसेच साक्षीदार पवन निकुंभ यांना ज्ञानेश्वर दिलीप निकुंभ व दिलीप भगवान निकुंभ यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करीत हाताबुक्यांनी मारहाण केली. याबाबत काशिनाथ निकुंभ यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पानेा.अजित गावित करीत आहेत.








