Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

परिवर्धा केंद्राचे केंद्रप्रमुख संतोष पाटील यांचा सेवापूर्ती सोहळा

team by team
April 30, 2022
in शैक्षणिक
0
परिवर्धा केंद्राचे केंद्रप्रमुख संतोष पाटील यांचा सेवापूर्ती सोहळा

नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील परिवर्धा केंद्राचे केंद्रप्रमुख संतोष आनंदराव पाटील हे नियत वयोमानाने दि.३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानिमित्ताने परिवर्धा केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांनी संतोष पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ जि.प.शाळा परिवर्धा येथे घडवून आणला.
सदरील सेवापूर्ती सोहळ्याला अध्यक्षस्थानी मोहन शेवाळे जि.प. सदस्य हे उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थिती डी.टी.वळवी गटशिक्षणाधिकारी प.स. शहादा, उषा पेंढारकर माजी व निवृत्त गटशिक्षणाधिकारी, जगदीश पाटील, मनोज कदम, अनंतराव महिरे, केंद्रशाळा परिवर्धाच्या मुख्याध्यापिका कल्पना शिंदे, सुरेश ठाकरे शा.व्य.समिती अध्यक्ष तऱ्हाडी, आनंदराव राजपूत शिक्षण प्रेमी तऱ्हाडी, गोपाळ गावित जिल्हाध्यक्ष, प्रहार शिक्षक संघटना , मंगेश पाटील, संतोष पाटील यांची आई वत्सलाबाई आनंदराव पाटील तसेच संतोष पाटील यांचे सर्व कुटुंब आई,पत्नी,भाऊ,मुले,सुनबाई उपस्थित होते. सुरवातीला संतोष पाटील यांच्या जीवनकार्याचा व केलेल्या सेवेचा आढावा घेणारी चित्रफित दाखवण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुकाराम अलट यांनी केले. केंद्रातील सर्व शिक्षक व मान्यवरांच्या हस्ते संतोष पाटील यांचा सहकुटुंब सत्कार भेटवस्तू देऊन करण्यात आला. त्यानंतर केंद्रप्रमुख संतोष पाटील यांच्या कामाबद्दलचे अनुभव आपल्या मनोगतातून शिक्षकांनी व्यक्त केले. मीना पाटील, मनीषा शिवदे, स्नेहल गुगळे, आधार मोरे, शक्ती धनके, मनोज राठोड, नरेंद्र कुवर, गुलाब राठोड, प्रहार शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष तुकाराम अलट आदी शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. तदनंतर व्यासपीठावरील मान्यवर डी.टी.वळवी, उषा पेंढारकर, जगदीश पाटील, गोपाळ गावीत, मोहन शेवाळे यांनी संतोष पाटील यांच्या कार्याबद्दल आपल्या मनोगतातून व्यक्त झाले. “ माणूस हा त्याच्या पदापेक्षा त्याच्या कामावरून मोठा दिसतो. असेच संतोष पाटील याचं काम आहे.संतोष पाटील केंद्रपमुख म्हणून कोणत्याही शाळेत गेले तर ते अगोदर कार्यालयात न जाता थेट वर्गात जावून विद्यार्थ्यांसोबत बसून गप्पा मारतात, त्यांना शिकवतात, विद्यार्थ्यांत रमून जातात. असा अधिकारी शिक्षकांसोबत विध्यार्थ्यांना पण खुप आवडतो. नेहमी शिक्षकांच्या अडचणींत त्यांना मदत करणे, प्रशासन व्यवस्थित सांभाळणे हे कौशल्य केंद्रप्रमुख म्हणून सहज पार पाडणारे केंद्रप्रमुख संतोष आनंदराव पाटील यांच्या निवृत्त होण्याने नक्कीच शिक्षण क्षेत्रात एक चांगल्या अधिकाऱ्याची कमतरता जाणवेल.” असे सर्व मान्यवर व्यक्त झाले. तर संतोष पाटील यांच्या कुटुंबांनी त्यांच्या सेपापुर्तीचा आनंदाने स्वीकार करत आनंद व्यक्त केला. सेवापूर्ती सोहळ्यासाठी सर्व उपस्थितांना भोजनाची सोय करणारे जि.प.शाळा तऱ्हाडी चे मुख्याध्यापक जयवंत सोनवणे व जि.प.शाळा ठेंगचे चे मुख्याध्यापक गुलाब राठोड व सहशिक्षक शांतीलाल अहिरे, प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा संघटक तानाजी नवगिरे,अंबादास कऱ्हाळे आणि अनिल चिकटे यांनी मेहनत घेतली. ईश्वर कोळी यांनी फलकलेखन करून सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयवंत जोशी यांनी केले तर मनीषा गावडे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

टपरी काढण्याच्या वादातून दोघांना हातोडीने मारहाण

Next Post

खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते ३० महिला बचत गटानां 35 लाखांचे कर्ज मंजुरीचे पत्र वाटप, 660 जणांचा काढला विमा

Next Post
खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते ३० महिला बचत गटानां 35 लाखांचे कर्ज मंजुरीचे पत्र वाटप, 660 जणांचा काढला विमा

खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते ३० महिला बचत गटानां 35 लाखांचे कर्ज मंजुरीचे पत्र वाटप, 660 जणांचा काढला विमा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add