नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळामार्फत लाभार्थींनी घेतलेल्या कर्ज प्रकरणांत संपुर्ण थकित कर्ज रक्कमेचा एकरक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांस 50 टक्के व्याज सवलत देण्याबाबत सुधारीत एकरक्कमी परतावा (ओटीएस) योजना 31 मार्च 2023 पर्यंत राबविण्यात येत असून महामंडळाच्या थकीत कर्जदारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ,नंदुरबार डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकर तलाव रोड, नंदुरबार (दूरध्वनी क्रमांक 02564-210062) वर संपर्क साधावा.








