नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार वाढती इंधन दरवाढ व महागाईवर नियंत्रण ठेवण्यात केंद्र सरकारला आलेले अपयश याच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.बुधवारी सुभाष चौकात भोंगा आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, सुभाष पाटील, सरचिटणीस पंडितराव पवार, तालुका अध्यक्ष रोहिदास पाडवी, युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र सूर्यवंशी, तळोदा शहराध्यक्ष गौरव वाणी, जिल्हा परिषद सदस्य सुहास नाईक, सेवादल महिला जिल्हाध्यक्ष टी.आर. खान, सेवादल कार्याध्यक्ष एजाज बागवान, तालुका उपाध्यक्ष बापू कलाल, रोजगार व स्वयंरोजगार शहराध्यक्ष रहूफ शाह, किसान सचिव देवाजी चौधरी, सत्यवान पाडवी, योगेश पाडवी, प्रकाश ठाकरे, शांतीलाल पाटील, राजेंद्र पाटील, खंडेराव पवार, प्रवीण लोहार, प्रवीण वळवी आदी उपस्थित होते.
हातावर पोट असणाऱ्यांना खावे काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे. स्पष्ट केले. एकीकडे बेरोजगारी आणि दुसरीकडे महागाई अशा पेचात सर्वसामान्य सापडला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येत असल्याचे यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी
सांगितले. त्याच्याच निषेधार्थ नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे निषेध आंदोलन व भोंगा आंदोलन करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.








