Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कर्मचाऱ्यांना चोरी करताना मालकाने रांगे हात पकडले, पाच जणांना अटक, चार लाखाचा मुद्देमाल जप्त

team by team
April 28, 2022
in क्राईम
0
कर्मचाऱ्यांना चोरी करताना मालकाने रांगे हात पकडले, पाच जणांना अटक, चार लाखाचा मुद्देमाल जप्त

नवापूर l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील वाकीपाडा पोल्ट्रीमधील शीतगृहात साठवलेले ७५ हजार रुपये किंमतीची अंडी चोरुन नेतांना तेथील पर्यवेक्षक, चालक, द्वारपाल व इतर तिघांना पोल्ट्री मालकानेच रंगेहाथ पकडले. पोलिसांनी अंडीसह चार लाखाचा मुद्देमाल जप्त केला असुन पाच संशयितांना अटक केली आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, नवापूर शहराजवळ वाकीपाडा शिवारात अब्दुल सलाम बलेसरिया यांच्या मालकीचे पोल्ट्री फार्म व शीतगृह आहे. दि. २७ एप्रिल रोजी होते. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास अब्दुल सलाम बलेसरिया हे मुलगा मोहंमद व अतिक यांना सोबत घेऊन अचानक शीतगृहात गेले असता तेथील मुख्य दरवाजा उघडा दिसून आला. शीतगृहासमोर टेम्पो उभा दिसला. त्यात काही इसम शीतगृहातील साठवलेली अंडीचा ट्रे टेम्पोमध्ये भरतांना दिसून आले. टेम्पोजवळ गेले असता कामावर असलेले पर्यवेक्षक, चालक, द्वारपाल व इतर असल्याचे दिसून आले. मालकांना पाहुन त्यांनी तारकुंपण ओलांडून पळ काढला. मात्र अंडी वाहतूक करणारा पर्यवेक्षक जुबेर गुलाब सैय्यद हा शीतगृहातून बाहेर येतांना मालकाच्या हाती लागला. टेम्पोमध्ये सुमारे ७५ हजाराचे अंडे ठेवलेले होते.मोहंमद अब्दुल सलाम बलेसरिया यांनी नवापूर पोलीसांत घटनेची खबर देउन जुबेर गुलाब सैय्यद यांस आपल्या इतर साथीदारांबाबत विचारणा केली असता तेथे कामावर असलेला बिलालखान फिरोजखान, महंमद इब्राहिम माकडा, चालक नितेश गोविंद मावची, द्वारपाल जयराम, रवींद्र मारग्या भिल, टेम्पो चालक रवींद्र नाईक रा. सोनगढ़ व अंडी खरेदी करणारा मुकेश नावाचा व्यापारी असे असल्याचे सांगितले.
तेथे अंडीने भरलेले टेम्पो, दोन दुचाकी वाहन असा पावणेपाच लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेतला. पोलिसांनी जुबेर गुलाब सैय्यद बिलाल खान फिरोजखान, महंमद इब्राहिम माकडा, चालक नितेश गोविंद मावची व रवींद्र मारग्या भिल यांना तातडीने अटक केली. पाचही संशयितांना नवापूर न्यायालयाने ३० एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहे. उर्वरित दोन फरार संशयितांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यासाठी पथक रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी दिली. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक अशोक मोकळं करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

बेवारस नादुरुस्त ट्रकमध्ये 5 लक्ष रुपयांचे खैर जातीचे लाकूड, वनविभागाने 8 लाखाचा मुद्देमाल केला जप्त

Next Post

काँग्रेसतर्फे केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात भोंगा आंदोलनाने वेधले लक्ष

Next Post
काँग्रेसतर्फे केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात भोंगा आंदोलनाने वेधले लक्ष

काँग्रेसतर्फे केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात भोंगा आंदोलनाने वेधले लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

20 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले, शाहाद्यात लाचलुचपत विभागाची धडाकेबाज कारवाई

April 30, 2026
राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

April 30, 2026
पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

April 30, 2026
‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

April 30, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

1 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन

April 30, 2026
मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add