नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील विसरवाडी कोंडाईबारी रस्त्यावर बेवारस नादुरुस्त ट्रकमध्ये 5 लक्ष रुपयांचे खैर जातीचे लाकूड आढळले वनविभागाने कार्यवाहीत लकदासह 3 लाखाचा असा एकूण ट्रकसह 8 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नंदुरबार वनक्षेत्र हद्दीतील नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी विसरवाडी राष्ट्रीय महामार्गावर चिंचपाडा व गस्ती पथक शहादा स्टाफ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या शासकीय वाहनाने विसरवाडी ते कोंडाईबारी रस्त्याने गस्त करताना पोलिस चौकीच्या पुढे हायवे रोडवर एक ट्रक उभा नादुरुस्त अवस्थेत मागील टायर खोललेला बेवारस ट्रक (क्र. एम.एच. एम. 4066 ) दिसला सदर ट्रकमध्ये ताडपत्री खाली खैर जातीचे तासतुस केलेला माल मिळून आला सदर माल खाजगी वाहनाने नवापूर आगार डेपो येथे जमा केला व सदर जप्त केलेले ट्रक क्रेन मशीनच्या साहाय्याने नवापूर आगार डेपो येथे जमा पावतीने जमा केला. मालाची अंदाजित किंमत 5 लक्ष रुपये, अंदाजित 10 टन व वाहनाची अंदाजित किंमत 3 लक्ष रुपये असा एकूण 8 लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला बाबत वनरक्षक सोनखांब यांनी वनगुन्हा नोंदविला सदरची कार्यवाही ही वनसंरक्षक धुळे पगार, उपवनसंरक्षक नंदुरबार वन विभाग शहादा कृष्णा भवर,विभागीय वनअधिकारी दक्षता धुळे श्रीमती कुलकर्णी,सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार धनंजय पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.








