म्हसावद l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथुन चारा भरुन कुंड्या गावी जात असतांना , सिंधीदिगर घाटात वाहन पलटी होवुन अपघातात एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.जखमींना तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याप्रकरणी म्हसावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज दि . 27 एप्रिल रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास महिंद्रा पिकअप (क्र . MH – 39 – AD – 1550) हे वाहन धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथुन चारा भरुन कुंड्या गावी जात असतांना , सिंधीदिगर घाटात , वळण रस्त्यावर सदरचे वाहन रस्त्याच्या डाव्या बाजुला पलटी होवुन अपघात झाला . सदर अपघातात वाहनात बसलेले प्रवासी अरविंद भुवानसिंग पावरा ( 16 वर्षे ) रा . कुंड्या , ता . धडगांव हा मयत झाल असुन , सुनिल जेसला पावरा, अनिल जेसला पावरा, जेसला हिरा पावरा , सर्व रा . कुंड्या , ता . धडगांव हे तिघांना गंभीर दुखापती झाल्या आहेत . तसेच वाहनाचे नुकसान झालेले आहे . सदर अपघाताबाबत बेहरमसिंग दितल्या पावर रा . कुंडवा , ता . धडगांव यांनी म्हसावद पोलीस ठाण्यात फिर्यादी दिल्यावरुन वाहन चालक संदीप रमेश पावरा , रा . चाँदसैल , ता . शहादा , जि . नंदुरबार याच्याविरुद्ध भादवि कलम 304 ( अ ) , 337 , 338 , 279 , 427 सह मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे . अपघाताची माहिती कळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक , निवृत्ती पवार , असई फुलसिंग पटले , पोहेकॉ जितेंद्र पाडवी , पोना शैलेंद्रसिंग राजपुत , पोना घनश्याम सुर्यवंशी , पोशि उमेश पावरा व चापोशि सचिन तावडे पोहचले त्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने अपघातग्रस्त प्रवास्यांना बाहेर काढुन ग्रामीण रुग्णालय , तोरणमाळ येथे दाखल केले . सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ चंदु साबळे हे करीत आहेत .








