Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सिंधीदिगर घाटात चाऱ्याचे वाहन पलटी होवुन झाला अपघात,एक ठार तीन जण गंभीर जखमी, एका विरुद्धगुन्हा दाखल

team by team
April 27, 2022
in क्राईम
0
सिंधीदिगर घाटात चाऱ्याचे वाहन पलटी होवुन झाला अपघात,एक ठार तीन जण गंभीर जखमी, एका विरुद्धगुन्हा दाखल

म्हसावद l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथुन चारा भरुन कुंड्या गावी जात असतांना , सिंधीदिगर घाटात वाहन पलटी होवुन अपघातात एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.जखमींना तोरणमाळ  ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याप्रकरणी म्हसावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज दि . 27 एप्रिल रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास महिंद्रा पिकअप (क्र . MH – 39 – AD – 1550) हे वाहन धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथुन चारा भरुन कुंड्या गावी जात असतांना , सिंधीदिगर घाटात , वळण रस्त्यावर सदरचे वाहन रस्त्याच्या डाव्या बाजुला पलटी होवुन अपघात झाला . सदर अपघातात वाहनात बसलेले प्रवासी अरविंद भुवानसिंग पावरा ( 16 वर्षे ) रा . कुंड्या , ता . धडगांव हा मयत झाल असुन , सुनिल जेसला पावरा, अनिल जेसला पावरा, जेसला हिरा पावरा , सर्व रा . कुंड्या , ता . धडगांव हे तिघांना गंभीर दुखापती झाल्या आहेत . तसेच वाहनाचे नुकसान झालेले आहे . सदर अपघाताबाबत बेहरमसिंग दितल्या पावर रा . कुंडवा , ता . धडगांव यांनी म्हसावद पोलीस ठाण्यात फिर्यादी दिल्यावरुन वाहन चालक संदीप रमेश पावरा , रा . चाँदसैल , ता . शहादा , जि . नंदुरबार याच्याविरुद्ध भादवि कलम 304 ( अ ) , 337 , 338 , 279 , 427 सह मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे . अपघाताची माहिती कळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक , निवृत्ती पवार , असई फुलसिंग पटले , पोहेकॉ जितेंद्र पाडवी , पोना शैलेंद्रसिंग राजपुत , पोना घनश्याम सुर्यवंशी , पोशि उमेश पावरा व चापोशि सचिन तावडे पोहचले त्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने अपघातग्रस्त प्रवास्यांना बाहेर काढुन ग्रामीण रुग्णालय , तोरणमाळ येथे दाखल केले . सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ चंदु साबळे हे करीत आहेत .

बातमी शेअर करा
Previous Post

मुंबई – आग्रा महामार्गावर 89 तलवारी आणि एक खंजीर जप्त , चौघांना अटक

Next Post

देहली प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू, प्रकल्पग्रस्तांनी कुणाच्या भूलथापांना बळी पडू नये: पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी

Next Post
महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ

देहली प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू, प्रकल्पग्रस्तांनी कुणाच्या भूलथापांना बळी पडू नये: पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add