Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मुंबई – आग्रा महामार्गावर 89 तलवारी आणि एक खंजीर जप्त , चौघांना अटक

team by team
April 27, 2022
in क्राईम
0
मुंबई – आग्रा महामार्गावर 89 तलवारी आणि एक खंजीर जप्त , चौघांना अटक

धुळे । प्रतिनिधी
सोनगीर पोलिसांनी मुंबई – आग्रा महामार्गावर एका स्कॉर्पीओचा पाठलाग करुन वाहनामधील 89 तलवारी आणि एक खंजीर जप्त केला आहे. याप्रकरणी जालना येथील चौघांना अटक करण्यात आली आहे.
सोनगीर पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी आज सकाळी गस्त घालत असतांना मुंबई-आग्रा महामार्गावर वाघाडी फाट्यानजीक, शिरपूरकडून धुळ्याच्या दिशेने( एम.एच.09 सी.एम.0015) क्रमांकाची काळ्या रंगाची काच असलेली स्कॉर्पीओ भरधाव वेगाने जातांना दिसून आली. त्यामुळे गस्तीवरील पोलिसांना संशय आल्याने त्यांनी स्कॉर्पीओचा पाठलाग करुन वाहन थांबविण्याचा चालकाला इशारा दिला मात्र त्यानंतर चालकाने वाहन भरधाव वेगाने नेली.
पोलिसांनी पुन्हा पाठलाग करुन सोनगीर फाट्याजवळ स्कॉर्पीओला ओव्हरटेक करुन गाडी थांबविली. वाहनामध्ये चार जण होते. त्यांची विचारपुस केली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. पोलिसांचा संशय आणखी बळावला. स्कॉर्पीओची तपासणी केली असता त्यात 89 तलवारी आणि एक खंजीर आढळून आला. पोलिसांनी वाहनासह 7 लाख 13 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी मोहम्मद शरीफ मोहम्मद शफीक (वय 35), शेख इलीयाज शेख लतीफ (वय 32) दोघे रा.सिध्दार्थ नगर, वैशाली किराणा जवळ, जालना, सैय्यद नईम, सैय्यद रहीम (वय 29) रा.सुंंदरनगर, एसटी वर्क शॉपच्या मागे जालना, कपील विष्णू दाभाडे (वय 35) रा.पंचशील नगर, बुध्द विहार जवळ, जालना या चौघांना अटक करण्यात आली. सोनगीर पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 मोटर वाहन कायदा कलम 184, 239, /177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास एपीआय चंद्रकांत पाटील हे करीत आहेत.सदर कारवाई पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव, डीवायएसपी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय चंद्रकांत पाटील, हे.कॉ.शामराव अहिरे, पोना ईश्वर सोनवणे, पो.कॉ.सुरज साळवे यांच्या पथकाने केली.

बातमी शेअर करा
Previous Post

कोरोनाची पुन्हा बंधने नको असतील तर स्वयंशिस्त पाळा,मास्क वापरणे, लस घेणे अपरिहार्य : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

सिंधीदिगर घाटात चाऱ्याचे वाहन पलटी होवुन झाला अपघात,एक ठार तीन जण गंभीर जखमी, एका विरुद्धगुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add