नंदुरबार l प्रतिनिधी
रेल्वेखाली आल्याने एका अज्ञात युवकाचा मृत्यू झाला असून नातेवाईकांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नंदुरबार-चौपाळे रेल्वेमार्गावर उड्डाणपुलाजवळ 25 ते 30 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळुन आला आहे. सदर युवक शरीराने मध्यम असून उंची 164 से.मी.आहे. नातेवाईकांनी चौकशी अधिकारी विश्वनाथ सपकाळे (मो.नं.9657157277) तसेच नंदुरबार शहर दुरध्वनी (क्रमांक 02564-222200) वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.








