Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार नगरपालीकेत दोनशे करोडच्या भ्रष्ट्राचाराची भाजपची याचिका न्यायालयाने फेटाळली

team by team
April 26, 2022
in राजकीय
0
नंदुरबार नगरपालीकेत दोनशे करोडच्या भ्रष्ट्राचाराची भाजपची याचिका न्यायालयाने फेटाळली

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार नगरपालीकेवर विरोधी भाजपाकडुन होत असलेल्या दोनशे करोडच्या भ्रष्ट्राचाराच्या आरोपांबाबत न्यायालयाने विरोधी पक्षनेते चारुदत्त कळवणकर यांची याचीका फेटाळली आहे. कुठलाही पुरावे नसतांना बिनबुडाचे आरोप करणाऱया विरोधाकांनी या साऱया प्रकरणात थेट ईडीकडुन (अंमलबजावणी संचलनालय) चौकशीची मागणी केली होती. मात्र न्यायालयात या बाबत कुठलेही पुरावे सादर करु न शकल्याने ही याचीका फेटाळली आहे. यामुळे दुध का दुध आणि पाणी पाणी झाले असल्याच्या प्रतिक्रीया शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे.
नंदुरबार नगरपरिषदेमध्ये विविध विकास कामांमद्ये सन 2005 ते 2020 या कार्यकाळात जवळपास दोनशे कोटींचा भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप सातत्याने विरोधी भाजपाकडुन केल्या जात होता. यावरुन अनेक वेळा सभा प्रतिसभामधुन रणकंदन देखील पहावयास मिळाले होते. याच अनुशंगाने नंदुरबार नगरपरिषदेमधील भाजपाचे विरोधी पक्षनेते चारुदत्त कळवणकर यांनी थेट उच्च न्यायालयच्या औरंगाबाद खंडपिठात रिट याचीका दाखल केली होती. या याचिके मध्ये चारुदत्त कळवणकर यांनी संबंधीत कार्यकाळात नंदुरबार नगरपालीके दोनशे कोटींपेक्षा जास्तचा भ्रष्ट्राचार झाल्याचा दावा केला होता.
यातील प्रतिवादी भारत सरकार यांना या भ्रष्ट्राचाराच्या अनुशंगाने थेट ईडीमार्फत (अंमलबजावणी संचलनालय) या साऱया प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी कळवणकर यांनी केली होती. या साऱया याचिकेबाबत मेहरमान न्यायलायाने विचार करत भाजपाचे विरोधी पक्षनेते चारुदत्त कळवणकर यांची याचीका फेटाळुन लावली आहे. न्यायालाने याचिकाकर्त्यांनी या संदर्भात कोणताही गुन्हा दाखल केलेला नसल्याचे निष्कर्ष नोंदवला आहे तसेच याचीका करतांना कलम 156 (3) चा आधार देखील घेतला नसल्याचे नोंदवले आहे
याचिकाकर्ते श्री.कळवणकर यांच्याकडे फक्त लेखापरिक्षण अहवाल असुन मुळातच या साऱ्या बाबत यापुर्वीच प्रधानसचिवांनी 10 जुलै 2015 रोजी चौकशी अहवाल सादर केला असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. या व्यतिरीक्त कुठलेही ठोस असे पुरावे सादर करण्यात भाजपाला अपयश आले असुन यामुळे न्यायालयाने या आरोपांबाबत याचिका फेटाळुन लावली आहे.

दुध का दुध आणि पाणी का पाणी

या निकालानंतर शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी हा निर्णय म्हणजे दुध का दुध आणि पाणी का पाणी असा करणारा असल्याची प्रतिक्रीया दिली आहे. भ्रष्ट्राचार झाला नसतांना जनतेची दिशाभुल करण्यासाठी कांगावा करुन दोनशे कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा विरोधकांकडुन होत असलेल्या आरोपाबाबत कोणतेही पुरावे नसल्याने न्यायालयान त्यांची फेटाळल्याने हे प्रकरणच बरच काही सांगुन जात असल्याचे त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार-चौपाळे रेल्वेमार्गावर उड्डाणपुलाजवळ रेल्वेखाली 25 वर्षीय युवकाचा मृत्यू

Next Post

वुई द पीपल या प्रबोधनात्मक संगीतमय महानाट्यसह राज्यस्तरीय समता रत्न व समता भूषण पुरस्कार वितरण सोहळा समता युवा मंचतर्फे दिमाखात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add