नवी दिल्ली –
केंद्र सरकारच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (P. M. Modi) योजनेचा अकरावा हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली आहे. देशातील प्रत्येक राज्यातील पात्र शेतकर्यांना अकरावा हप्ता मोदी अक्षय तृतीयेच्या दिवशी स्वताच्या हस्ते वाटप करण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजना ही केंद्राची असली तरी राज्यातील यंत्रणेच्या माध्यमातून लाभार्थी ठरण्याची प्रक्रिया असते. त्याच अनुशंगाने 11 हप्त्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या याद्या केंद्राकडे सपूर्द केल्या आहेत. त्यानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी औपचारिकरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदीच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहेत. गतवर्षीही 15 मे ला ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली होती.
असे चेक करा पैसे जमा झाले का?
पीएम किसान खात्याची तपासणी करताना जर Waiting For Approval By State असा एसएमएस असेल तर राज्य सरकारकडून पूर्तता झालेली नाही आणि जर FTO is Generated and Payment Confirmation is Pending असा SMS असेल तर मात्र, आपल्या खात्यामध्ये 11 हप्ता जमा होण्याची प्रक्रिया ही सुरु झाली आहे.