Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डोकारे गावातील एका घरात आग लागल्याने घर जळून खाक

team by team
April 25, 2022
in क्राईम
0
डोकारे गावातील एका घरात आग लागल्याने घर जळून खाक

विसरवाडी l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील डोकारे गावात रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास एका घराला आग लागल्याने घरातील लाकूड साहित्य तसेच संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे समजते. आग कशामुळे लागली आगीचे कारण समजू शकले नाही
प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार, डोकारे गावातील संदीप शंकर वळवी यांच्या घराला दुपारी एक-दीड वाजता सुमारास अचानक आग लागल्याने घरातील संसारोपयोगी साहित्य, कृषी विषयक साहित्य लाकडं जळून खाक झाले आहे.यात संदीप शंकर वळवी यांचे मोठे नुकसान झाले आहे. घराजवळच गुरेढोरे, बकर्‍या बांधल्या होत्या आग लागताच आजोबा जातील ग्रामस्थांनी पाळीव प्राण्यांची तात्काळ सुटका केली या आगीत कुठलीही जीवनात जीवित हानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.
घराला अचानक आग लागल्याने आगीने तात्काळ रुद्र रूप धारण केले डोकारे गावातील ग्रामस्थांनी मिळेल त्या साधनाने पाणी टाकत आग विझवण्याचा प्रयत्न केला.परंतु हवेचा वेग जास्त असल्याने आगीचे लोट वर पर्यंत जात होते. आग नियंत्रणात आणणे ग्रामस्थांचा हाताबाहेर गेल्याने लागलीच गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रभू गावित यांनी नवापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा हेमलता पाटील यांना संपर्क करून आगीची माहिती दिली त्यानंतर नवापूर अग्निशामन दलाला पाचारण करण्यात आले. तासाभरात अग्निशामन दलाचे जवान सलीम पठाण, भास्कर भालेराव, संतोष वाघ यांनी दोन बंबाच्या साह्याने आग आटोक्यात आणली.महसूल विभागाने पंचनामा करून लवकर नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी वळवी कुटुंबाने केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

खांडबारा येथील रेल्वे स्थानकावर एका युवकाचा मृत्यू

Next Post

पंतप्रधान मोदी स्वतः टाकणार अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर शेतकर्‍यांचा खात्यात पैसे

Next Post
पंतप्रधान मोदी स्वतः टाकणार अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर शेतकर्‍यांचा खात्यात पैसे

पंतप्रधान मोदी स्वतः टाकणार अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर शेतकर्‍यांचा खात्यात पैसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add