विसरवाडी l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील डोकारे गावात रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास एका घराला आग लागल्याने घरातील लाकूड साहित्य तसेच संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे समजते. आग कशामुळे लागली आगीचे कारण समजू शकले नाही
प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार, डोकारे गावातील संदीप शंकर वळवी यांच्या घराला दुपारी एक-दीड वाजता सुमारास अचानक आग लागल्याने घरातील संसारोपयोगी साहित्य, कृषी विषयक साहित्य लाकडं जळून खाक झाले आहे.यात संदीप शंकर वळवी यांचे मोठे नुकसान झाले आहे. घराजवळच गुरेढोरे, बकर्या बांधल्या होत्या आग लागताच आजोबा जातील ग्रामस्थांनी पाळीव प्राण्यांची तात्काळ सुटका केली या आगीत कुठलीही जीवनात जीवित हानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.
घराला अचानक आग लागल्याने आगीने तात्काळ रुद्र रूप धारण केले डोकारे गावातील ग्रामस्थांनी मिळेल त्या साधनाने पाणी टाकत आग विझवण्याचा प्रयत्न केला.परंतु हवेचा वेग जास्त असल्याने आगीचे लोट वर पर्यंत जात होते. आग नियंत्रणात आणणे ग्रामस्थांचा हाताबाहेर गेल्याने लागलीच गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रभू गावित यांनी नवापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा हेमलता पाटील यांना संपर्क करून आगीची माहिती दिली त्यानंतर नवापूर अग्निशामन दलाला पाचारण करण्यात आले. तासाभरात अग्निशामन दलाचे जवान सलीम पठाण, भास्कर भालेराव, संतोष वाघ यांनी दोन बंबाच्या साह्याने आग आटोक्यात आणली.महसूल विभागाने पंचनामा करून लवकर नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी वळवी कुटुंबाने केली आहे.