नंदूरबार l प्रतिनिधी
नवापुर तालुक्यातील खांडबारा येथे गुजरात राज्यातील सोनगड येथून एक भाविक धार्मिक स्थळावर दर्शनासाठी आले होते. दर्शन करून घरी रेल्वेने जात असताना खांडबारा रेल्वे स्थानकावर अचानक छातीत कळ आल्याने असहाय्य वेदना होत असल्याने व्यक्तीचा खांडबारा येथील रेल्वे स्थानकाचा फलाटावर मृत्यू झाला.
खांडबारा रेल्वे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुजरात राज्यातील सोनगड तालुक्यातील कुंकुवा गावातील महिंद्रभाई गामित वय 40 सदर व्यक्ती खांडबारा गावात एका मंदिरात दर्शनासाठी आला असता रेल्वे कुंकुवा गावला आपल्या घरी परत जात असताना अचानक रेल्वे स्थानकावर मृत्यू झाल्याने खांडबारा गावात खळबळ उडाली आहे.रेल्वे प्रशासन नंदुरबार रेल्वे पोलिसांना कळविण्यात आला असता खांडबारा रेल्वे स्थानकावर घटनास्थळी रजेसिंग गावित रेल्वे पी आय यांनी घटनास्थळी पाहणी करून सदर व्यक्तीचे नातेवाईकांना पाचारण करून माहिती देण्यात आली.
नंदुरबार रेल्वे पोलिसांनी द्वारा मृत व्यक्तीच्या पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा 42 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान गेले आहे. बाहेर उन्हाची तीव्रता दिसून येत आहे. सदर व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाला असल्याचे बोलले जात आहे मृतदेह खांडबारा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप वळवी यांनी तपासणी केली असता प्राथमिक माहितीनुसार पॅरॅलिसिस मुळे हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती डॉक्टर वळवी यांनी दिली.