नंदुरबार l प्रतिनिधी
येथील कोरीट नाका परिसर समता युवा मंच, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने सोमवार दि.२५ एप्रिल २०२२ रोजी वुई द पिपल संगीतमय महानाट्याचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्रातील ख्यातनाम महिला शाहीरा सीमा पाटील आणि गीत व संगीतकार जॉली मोरे प्रस्तुत संगीतमय महानाट्याचा प्रयोग सादरीकरण करण्यात येणार आहे.
विश्ववंदनीय महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नंदुरबार येथील समता युवा मंच कोरीट नाका परिसर नंदुरबार आणि महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रम घेण्यात आले. तसेच दि. २५ एप्रिल २०२२ रोजी महाराष्ट्रातील ख्यातनाम महिला शाहीरा सीमा पाटील आणि गीत व संगीतकार जॉली मोरे प्रस्तुत तथागत बुद्ध, चक्रवर्ती अशोक सम्राट, छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित वुई द पिपल संगीतमय महानाट्याचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. नंदुरबार शहरातील कोरिट नाका परिसरात स्मित हॉस्पिटल समोर सोमवारी दि. २५ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ७ वाजता संगीतमय महानाट्याचा प्रयोग कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाला आंबेडकरी अनुयायींसह नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समता युवा मंच कोरीट नाका परिसर नंदुरबार आणि महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.








