Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सेन्ट्रल किचन योजना देशात राबविणार : केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीया, विद्यार्थींनींनी दिले मंत्र्यांना योद्धाचे चित्र भेट

team by team
April 24, 2022
in राजकीय
0
सेन्ट्रल किचन योजना देशात राबविणार : केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीया, विद्यार्थींनींनी दिले मंत्र्यांना योद्धाचे चित्र भेट

नंदुरबार | प्रतिनिधी
सेन्ट्रल किचनच्या माध्यमाने आदिवासी विद्यार्थ्यांना सकस व ताजे अन्न पुरवठा करण्याची केंद्र सरकारच्या नीती आयोगाची योजना आदिवासी भागासाठी लाभकारी ठरत असून, विद्यार्थ्यांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यास महत्वाची भूमिका बजावते आहे. ही योजना संपूर्ण भारतात राबविली जाईल त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत असे आज केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीया यांनी नंदुरबार येथील सेन्ट्रल किचनच्या पाहणी दरम्यान सांगितले.

केंद्रीय आरोग्य मंत्री श्री मांडविया हे काल पासून नंदुरबार जिल्ह्याच्या दौर्‍यावर असून त्यांनी आज सेन्ट्रल किचनची पाहणी केली. निवासी आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या आश्रमशाळे पर्यंत पुरवठा करण्यात येणारे अन्नातील पोषक घटकांची प्रयोगशाळेत तपासणी करून सकस, ताजे अन्न पुरेश्या प्रमाणात वेळेवर पोहोचावे यासाठी सेन्ट्रल किचन करीत असलेल्या प्रयत्नांचे श्री मांडवीया यांनी कौतुक केले. यावेळी त्यांनी प्रयोग शाळेसह संपूर्ण सेन्ट्रल किचनची पाहणी करून अन्न पुरवठ्याची यंत्रणा जाणून घेतली. तर तयार अन्नाची चवही घेतली.
नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत असलेल्या आश्रम शाळेतील जवळपास दहा हजार पेक्षा अधिक मुलांना या सेंट्रल किचन शेड च्या माध्यमातून दोन वेळचे जेवण व सकाळ-संध्याकाळचा नाश्ता अशा आहाराचा पुरवठा केला जातो.
मंत्री डॉ.मांडवीया यांनी नंदुरबार शहरातील एकलव्य मॉडेल शासकीय आश्रम शाळेलाही (एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल ) भेट दिली. विद्यार्थ्यांसोबत मंत्रीमहोदयांनी संवाद साधला तसेच या ठिकाणी असलेल्या बौद्धिक कार्यशाळेच्या वर्गाला भेट देऊन कार्यशाळेत राबवण्यात येणार्‍या उपक्रमां बद्दल माहिती जाणून घेतली. कोरोना युद्धात केंद्र सरकारने यशस्वी विजय प्राप्त केल्याने येथील विद्यार्थींनींनी मंत्रीमहोदयांना योद्धाचे चित्र भेट दिले.
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख माडविया यांनी काल आणि आज नंदुरबार जिल्हा दौरा दरम्यान विविध विकास कामांची पाहणी करून शासनाच्या योजना प्रत्यक्ष लाभार्थींपर्यंत पोहोचते याबद्दल माहिती जाणून घेतली. यावेळी यावेळी खा.डॉ.हिना गावीत, आ.डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी मनिषा खत्री,प्रकल्प अधिकारी मिनल करणवाल, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, जि.प.सदस्या सुप्रिया गावीत आदी उपस्थीत होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार शहरात २५ एप्रिलला होणार वुई द पिपल संगीतमय महानाट्याचा प्रयोग,समता युवा मंचतर्फे आयोजन

Next Post

राज्यातील पोलीस दलात 7 हजार 231 पदांची भरती करण्यात येणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post
राज्यातील पोलीस दलात 7 हजार 231 पदांची भरती करण्यात येणार :  उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यातील पोलीस दलात 7 हजार 231 पदांची भरती करण्यात येणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add