Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

युवारंगात समुह लोकनृत्याने धूम वेधले रसिकांचे लक्ष

Mahesh Patil by Mahesh Patil
April 23, 2022
in शैक्षणिक
0
युवारंगात समुह लोकनृत्याने धूम वेधले रसिकांचे लक्ष

नंदुरबार l प्रतिनिधी
युवारंग युवक महोत्सवाचा तिसर्‍या दिवशी खुला रंगमंच क्र १ वर विविध कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध समुह लोकनृत्य सादर केले.एकापेक्षा एक सरस कार्यक्रम सादर केले.यात वारकरी दिंडी, डलखाई संबळपुरी, हरीयानवी नृत्याची धूम पाहायला मिळाली.नृत्य सादर करीत असताना विविध भावनिक कथांचा सांगड घालीत मनाला स्पर्श करणारे नृत्य सादर केले. दरम्यान काळ्यो कुद पड्यो मेळे मे, सायकल पंक्चर कर ल्यायो, दो दिन ढब जा रे डोकरिया, छोरी म्हारी वाजारियो काढे या राजस्थानी कालबेलिया नृत्याने रसिकांचे लक्ष वेधले.


खुला रंगमंच क्र.१ वर (स्वा.से.अण्णासाहेब पी.के.पाटील रंगमंच) समुह लोकनृत्य या कला प्रकारात २६ संघांनी आपला सहभाग नोंदवत भलरी, पावरा नृत्य, शिबली नृत्य, आदिवासींच्या डोंगरातील देवाला प्रार्थना करणारे नृत्य, बंजारा नृत्य, टिपरी नृत्य, राजस्थानी नृत्य, बधाई नृत्य, कोळी नृत्य, खंडेरायाचा गोंधळ, भवाई नृत्य, जोगवा, पराईअट्टम नृत्य, आदिवासी पावरा लगीन नृत्य, डांगी नृत्य, दालखाई नृत्य, हरीयानवी नृत्य, दिंडी नृत्य या समुह लोकनृत्यांचे सादरीकरण केले. ढोल, नगारा, बासरी, पावरी, डफ, तारी, घुंगरूमाळ या वाद्यांचा अत्यंत कलात्मकतेने केलेल्या वापरामुळे आणि नृत्यासाठी विविध प्रांतातील लोककलेसाठी अभिप्रेत असलेले पोषाख काठेवाडी, गुजराती, आदिवासी, भिल्ल, नऊवारी, धोती-कुर्ता परिधान केले होते त्यामुळे प्रत्येक नृत्याने लक्ष खिळवून ठेवले.
आदिवासी नृत्याने रंगमंच गजबजला
आदिवासी संस्कृतीवर आधारित नृत्य प्रकार या रंगमंचावर संपन्न झाला. यामध्ये वापरले जाणारे विविध साहित्यांचा वापर याप्रसंगी दिसला. जे वाद्य आणि संस्कृतीचे दर्शन होळी, दिवाळी, यात्रा आणि लग्न समारंभामध्ये दिसत असतो तसाच इथं ही दिसला. आदिवासी संस्कृतीच्या विविध प्रकारच्या पारंपारिक रूढी परंपरांचे दर्शन घडून येते त्यांची वेशभूषा रंगभूषा राहणीमान त्यांची नृत्य इत्यादी पद्धतीचे प्रकटन सदर उपकला प्रकारातून होतांना दिसून आले. यामध्ये ढोल, शिबली, तुतारी सिटी इत्यादी साहित्याचा वापर करण्यात आले. दरम्यान यावेळी वारकरी दिंडी विद्यार्थ्यांनी सादर केली.तर पि.के.कोटेजा महाविद्यालय भुसावल येथील हरियानवी नृत्य सादर केले.सदरच्या विद्यार्थींनी गेल्या २० दिवसंापासुन या नृत्याची तयारी करीत होत्या. हे नृत्य त्यांनी स्वताह बसवले हे विषेश यात लग्नाआधि प्रियकरा सोबतचा नटखट पणा व लग्नानंतर आलेल्या जबाबदारीनंतर घरच्यांचे वागने याबाबी नृत्यातुन मांडुन त्यांनी प्रेक्षकांचे मने जिंकली.यावेळी पच्छिम ओरीसा मधील डलखाई संबळपुरी नृत्याने वाहवा मिळवली.
काळ्यो कुद पड्यो मेळे मे, सायकल पंक्चर कर ल्यायो, दो दिन ढब जा रे डोकरिया, छोरी म्हारी वाजारियो काढे या राजस्थानी कालबेलिया नृत्याने रसिकांचे लक्ष वेधले. कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी सादर होणारे कालेबेलिया नृत्य हा राजस्थानीं संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. त्याच्याशी निगडित हे गाणे त्यांच्यासाठी हे नृत्य म्हणजे अत्यंत अभिमानाची बाब आहे. हे नृत्य बदलत्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीशी सर्जनशील रूपांतराचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. ही जमात राजस्थानच्या ग्रामीण भागात वसलेली आहे. या नृत्यात वेशभूषातील कपडे हे काळ्या आणि लाल रंगाच्या मिश्रणाने बनवले असतात आणि त्यात भरतकाम केलेले असते. काळ्या व लाल रंगाचा घागरा या नृत्यात प्रमुख असून ती एक वेशभूषा आहे आणि ते नृत्य करतांना फिरतो. शरीराच्या वरच्या भागात परिधान केलेल्या कपड्याला अंगरखा म्हणतात, डोके वरून झाकलेले असते आणि खालच्या भागात लेहेंगा घातला जातो. सदर नृत्य लोक कथा वर आधारित असून होळी च्या विशेष वेळेस कालबेलिया नृत्य केला जात असतो.
रंगमंच क्र.१ स्वातंत्र सेनानी अण्णासाहेब पी.के.पाटील रंगमंच:- डॉ.डी.एम.पाटील, डॉ.एस.के.तायडे, प्रा.एस.पी.जोशी, डॉ.ए.एच.जेबानपुत्रा, श्रीमती विणा पाटील, सौ.सुनिता एम.पाटील, प्रा.उमेश यु.पाटील, प्रा.मिलिंद जे. पाटील, प्रा.एन.डी.पाटील, प्रा.प्राची दुसाणे, प्रा.अमृता पाटील, प्रा.आकाश जैन, प्रा.अमित धनकाणी, प्रा.लक्ष्मी धनकाणी, प्रा.जागृती पवार, डॉ.भरत चौधरी हे रंगमंचाची जबाबदारी सांभाळत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

ॲपेरिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

ट्रक अडवून पाच लाखांची मागणी, दहा जणांविरुद्ध गुन्हा

Next Post
अबब:वीज वितरण कंपनीत ६३ हजाराचा अपहार केल्याप्रकरणी सहाय्यक लेखापालविरूध्द गुन्हा दाखल

ट्रक अडवून पाच लाखांची मागणी, दहा जणांविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहादा तालुक्यातील शेकडो युवक शिवसेनेत दाखल,कन्साई,रायखेड,नांदेरखेडा, कुढावद ग्रामस्थांच्या समावेश

शहादा तालुक्यातील शेकडो युवक शिवसेनेत दाखल,कन्साई,रायखेड,नांदेरखेडा, कुढावद ग्रामस्थांच्या समावेश

July 29, 2025
शानदार पुरस्कार सोहळ्यात डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नैसर्गिक मानवधिकार सुरक्षा परिषदेच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

शानदार पुरस्कार सोहळ्यात डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नैसर्गिक मानवधिकार सुरक्षा परिषदेच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

July 29, 2025
धडगाव पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

धडगाव पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

July 29, 2025
शनिमांडळ येथे डोळे तपासणी शिबिराचे  पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते उद्घाटन

शनिमांडळ येथे डोळे तपासणी शिबिराचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते उद्घाटन

July 27, 2025
शिंदगव्हाण येथील जि.प. शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

शिंदगव्हाण येथील जि.प. शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

July 27, 2025
हरणमाळ जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला भात लागवडीचा प्रत्यक्ष अनुभव

हरणमाळ जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला भात लागवडीचा प्रत्यक्ष अनुभव

July 27, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group