Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आनंदोत्सव 2022 उन्हाळी शिबिराला उत्साहाने सुरुवात

team by team
April 18, 2022
in शैक्षणिक
0
नंदुरबार येथे एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आनंदोत्सव 2022 उन्हाळी शिबिराला उत्साहाने सुरुवात

नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार येथे दि.16 एप्रिल ते 20 एप्रिल या दरम्यान विद्यार्थ्यांसाठी विविध कलाकौशल्याला वाव देणारे आनंदोत्सव 2022 या उन्हाळी शिबिरास सुरुवात झाली.

सदर शिबिरात अतिशय वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 16 एप्रिल रोजी शिबिराला मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली असून शिबिराची सुरुवात प्रार्थना व राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर पहिल्या सत्रामध्ये इंटरनॅशनल योग व झुम्बा प्रशिक्षक सिद्धी पटेल यांनी विद्यार्थ्यांना झुम्बा एरोबिक्स व योग याविषयी विविध प्रात्यक्षिके दाखवून विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष सादरीकरण करून घेतले. त्यानंतर वेगवेगळ्या गटांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुसऱ्या सत्रात हस्तकला , विविध कला कुसरीच्या शोभेच्या वस्तू तयार करणे , फॅशन डिझायनिंग , तसेच वारली चित्रकला, मुलांसाठी क्रिकेट, इयत्ता 9 वी ते 11 वी च्या मुलींसाठी श्रीमती साक्षी वळवी यांनी सौंदर्य प्रसाधनांचे व आरोग्याचे प्राथमिक प्रशिक्षण डिले , अशा भरगच्च कार्यक्रमाने शिबिराचा प्रथम दिवस पार पडला .
दुसऱ्या दिवशी दि.18 एप्रिल रोजी सकाळच्या प्रार्थनेनंतर जंप रोपचे प्रात्यक्षिक तज्ज्ञांनी दाखवले . त्यानंतर नंदुरबार जिल्हा पोलीस बँडच्या पथकाने विविध देशभक्तीगीते सादर केली. विद्यालयातील लेझीम व ढोल ताशा पथकाने सुद्धा आपले प्रात्यक्षिक सादर केले. त्यानंतर पुन्हा झुंबा व एरोबिकचे प्रात्यक्षिक व सराव तज्ञ मार्गदर्शक सिद्धी पटेल यांनी घेतले. तसेच बेसिक मेकअप व आरोग्य याविषयी दुसरे सत्र घेण्यात आले. क्रीडांगणावर रस्सीखेच व फनिगेम्सचे देखील आयोजन करण्यात आले. शाळेतील भिंतींवर विद्यार्थ्यांनी वारली चित्रकलेचे प्रात्यक्षिक केले . तसेच अत्यंत कल्पकतेने विद्यालयातील शिक्षीकांनी विविध वस्तूंचा वापर करीत फॅशन डिझायनिंग केले . त्याच बरोबर हस्तकला कौशल्य उपक्रमात देखील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला . अजून पुढील दोन दिवस अश्याच प्रकारे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या प्राचार्या सौ. नूतनवर्षा वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

प्रहार अपंग क्रांती दलाच्या जिल्हा सल्लागार पदी ॲड दत्तात्रय कदमबांडे

Next Post

म्हसावद येथे आरोग्य शिबिरात ५०० जणांची तपासणी

Next Post
म्हसावद येथे आरोग्य शिबिरात ५०० जणांची तपासणी

म्हसावद येथे आरोग्य शिबिरात ५०० जणांची तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add