खापर l प्रतिनिधी
खापर ता.अक्कलकुवा येथे वीज पुरवठा बाबात येणार्या अडचणींसह विविध मागण्यांसाठी भाजपातर्फे १८ एप्रिलला रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते.मात्र महावितरणच्या अधिकार्यांनी मागण्या पुर्ण केल्याने आंदोलन स्थगीत करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती कि, भाजपातर्फे ११ एप्रिल रोजी महावितरण कंपनीला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.कारण मागच्या कित्येक महिन्यापासून महावितरण कंपनीने कोराई सबस्टेशन येथील ब्रेकरचे मेंटेनन्स चे काम न केल्यामुळे खापर गावासह परिसरात वारंवार होणारे खंडित वीज पुरवठा मुळे नागरिक त्रस्त झाले होते.त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व आक्रोश होता.म्हणूनच भारतीय जनता पक्षाने या निवेदनाद्वारे १८ एप्रिलला रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता.त्यात म्हटले होते की,दिलेल्या मुदती प्रमाणे आठ दिवसाच्या आत जर कोराई सब स्टेशन येथील मेंटेनन्स चे काम पूर्ण झाले नाही व काम पूर्ण होऊन खंडित वीज पुरवठा मध्ये फरक पडला नाही तर भाजपाकडून १८ तारखेला खापर चौफुली येथे रास्ता रोको करून तीव्र आंदोलन करण्यात येईल.महावितरण कंपनीने निवेदनाची गांभीर्याने तात्काळ दखल घेत आपण निवेदनात म्हटल्याप्रमाणे दिलेल्या मुदतीच्या आत त्यांनी सबस्टेशन येथील ब्रेकर रिपेरिंग चे काम हे तीन दिवसांपूर्वीच पूर्ण केले असून,सोबतच लोडशेडिंग सुद्धा तीन दिवसापासून बंद केली आहे व येणार्या दिवसात लोडशेडिंगचे प्रमाण शक्य तेवढे कमी करण्याचे आश्वासन व ट्रीपिंग मुळे खंडित होणार्या वीजपुरवठ्याच्या महत्त्वपूर्ण विषय कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन व केलेल्या कामाचे फोटोसहीत प्रूफ दिलेत.महावितरणचे उप कार्यकारी अभियंता डि.के.पाडवी व कनिष्ठ अभियंता खापर मन्सुरी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक गावित यांनी विनंती केली की आपण केलेल्या मागणीप्रमाणे सर्व काम पूर्ण झालेले आहेत तरी कृपया करून आपण आंदोलनास स्थगिती द्यावी. त्यामुळे १८ एप्रिल रोजी होणारे आंदोलन हे सर्व मागण्या पूर्ण झाल्यामुळे स्थगित केले आहे.यावेळी खापर उपसरपंच विनोद कामे, देविदास वसावे, किरण पाडवी, सुनील सूर्यवंशी, अविनाश पाडवी, सुनील सोनवणे आदी उपस्थीत होते.








