Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महावितरणच्या अधिकार्‍यांनी मागण्या मान्य केल्याने भाजपाचे रास्ता रोको आंदोलन स्थगित

team by team
April 17, 2022
in राजकीय
0
महावितरणच्या अधिकार्‍यांनी मागण्या मान्य केल्याने भाजपाचे रास्ता रोको आंदोलन स्थगित

खापर l प्रतिनिधी
खापर ता.अक्कलकुवा येथे वीज पुरवठा बाबात येणार्‍या अडचणींसह विविध मागण्यांसाठी भाजपातर्फे १८ एप्रिलला रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते.मात्र महावितरणच्या अधिकार्‍यांनी मागण्या पुर्ण केल्याने आंदोलन स्थगीत करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती कि, भाजपातर्फे ११ एप्रिल रोजी महावितरण कंपनीला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.कारण मागच्या कित्येक महिन्यापासून महावितरण कंपनीने कोराई सबस्टेशन येथील ब्रेकरचे मेंटेनन्स चे काम न केल्यामुळे खापर गावासह परिसरात वारंवार होणारे खंडित वीज पुरवठा मुळे नागरिक त्रस्त झाले होते.त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व आक्रोश होता.म्हणूनच भारतीय जनता पक्षाने या निवेदनाद्वारे १८ एप्रिलला रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता.त्यात म्हटले होते की,दिलेल्या मुदती प्रमाणे आठ दिवसाच्या आत जर कोराई सब स्टेशन येथील मेंटेनन्स चे काम पूर्ण झाले नाही व काम पूर्ण होऊन खंडित वीज पुरवठा मध्ये फरक पडला नाही तर भाजपाकडून १८ तारखेला खापर चौफुली येथे रास्ता रोको करून तीव्र आंदोलन करण्यात येईल.महावितरण कंपनीने निवेदनाची गांभीर्याने तात्काळ दखल घेत आपण निवेदनात म्हटल्याप्रमाणे दिलेल्या मुदतीच्या आत त्यांनी सबस्टेशन येथील ब्रेकर रिपेरिंग चे काम हे तीन दिवसांपूर्वीच पूर्ण केले असून,सोबतच लोडशेडिंग सुद्धा तीन दिवसापासून बंद केली आहे व येणार्‍या दिवसात लोडशेडिंगचे प्रमाण शक्य तेवढे कमी करण्याचे आश्वासन व ट्रीपिंग मुळे खंडित होणार्‍या वीजपुरवठ्याच्या महत्त्वपूर्ण विषय कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन व केलेल्या कामाचे फोटोसहीत प्रूफ दिलेत.महावितरणचे उप कार्यकारी अभियंता डि.के.पाडवी व कनिष्ठ अभियंता खापर मन्सुरी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक गावित यांनी विनंती केली की आपण केलेल्या मागणीप्रमाणे सर्व काम पूर्ण झालेले आहेत तरी कृपया करून आपण आंदोलनास स्थगिती द्यावी. त्यामुळे १८ एप्रिल रोजी होणारे आंदोलन हे सर्व मागण्या पूर्ण झाल्यामुळे स्थगित केले आहे.यावेळी खापर उपसरपंच विनोद कामे, देविदास वसावे, किरण पाडवी, सुनील सूर्यवंशी, अविनाश पाडवी, सुनील सोनवणे आदी उपस्थीत होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर भाजपा शहर प्रभारीपदी रमेश राणा यांची नियुक्ती

Next Post

ग्राहकांनी किरकोळ फसवणुकीकडे दुर्लक्ष करु नये : आमदार मंजुळाताई गावित

Next Post
ग्राहकांनी किरकोळ फसवणुकीकडे दुर्लक्ष करु नये : आमदार  मंजुळाताई गावित

ग्राहकांनी किरकोळ फसवणुकीकडे दुर्लक्ष करु नये : आमदार मंजुळाताई गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add