नवापूर l प्रतिनिधी
नवापूर येथील भारतीय जनता पार्टी पक्षाचे निष्ठावंत,जेष्ठ कार्यकर्ते रमेशभाई धनसुखलाल राणा यांची भारतीय जनता पार्टी नवापूर शहर प्रभारी या पदावर वरीष्ठांच्या आदेशानुसार नियुक्ती करण्यात आली आहे.या बाबतचे नियुक्ती पत्र भारतीय जनता पाटीचे तालुका अध्यक्ष भरत गावीत यांनी रमेशभाई राणा यांना दिले. रमला राणा हे नवापूर ग्रामपंचायत पासुन निवडुन येत होते.यात १९८५ पासुन नवापूर नगरपालिका अस्तिवात आल्या पासुन ते नगरसेवक होते.जुना अनुभव असल्यामुळे भारतीय जनता पार्टीने ही जवाबदारी त्यांना दिली आहे.या बाबत त्यांची निवड झाल्या बद्दल भाजपाचे जिल्हासरचिटणी राजेंद्र गावीत,एजाज शेख,जयंतीलाल अग्रवाल,जितेंद्र अहिरे,दिनेश चौधरी,हेमंत जाधव,प्रणव सोनार,जाकीर पठाण,सप्नील मिस्त्री आदी भाजपच्या पदधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.








