Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार जिल्ह्यातील चारही नगरपालिकांमध्ये जागांची वाटणी योग्य न झाल्यास राष्ट्रवादी स्वबळावर लढणार : माजी मंत्री एकनाथ खडसे

team by team
April 17, 2022
in राजकीय
0
नंदूरबार जिल्ह्यातील चारही नगरपालिकांमध्ये जागांची वाटणी योग्य न झाल्यास राष्ट्रवादी स्वबळावर लढणार : माजी मंत्री एकनाथ खडसे

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढण्यास प्राधान्य देणार असून यासाठी जागांची वाटणी सुयोग्य नियोजनपूर्वक करण्याच्या आग्रह राहणार असून तसे न झाल्यास राष्ट्रवादी स्वबळावर देखील लढणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी तळोदा येथील राष्ट्रवादी काँग्रेस च्या पक्ष कार्यालयात पत्रकारांशी बोलतांना दिले.

राष्ट्रवादी चे नेते एकनाथराव खडसे हे शनिवारी तळोदा शहराजवळील बुहुरुपा येथे लग्न समारंभासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी तळोदा राष्ट्रवादी च्या शहरातील कार्यालयास भेट दिली होती. एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादी कार्यालयाजवळ आले असता कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत फटाक्यांच्या आतिषबाजीने जोरदार करण्यात आले. त्यानंतर ते विश्रामगृहात आले. त्यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी जिल्ह्यातील डिसेंमबर मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांबद्दल पक्षाच्या भूमिकेबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस नंदुरबार जिल्ह्यातील चारही नगरपालिकांची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढण्यास प्राधान्य देणार आहे. परंतु त्यासाठी जागांचे नियोजन सुयोग्यपणे करण्याची अपेक्षा आहे. तसे झाले नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहे. सध्या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकर्ते वेगवेगळे विधायक उपक्रम राबवून पक्ष संघटन ही मजबूत करीत आहे. याशिवाय शहादा व नंदुरबार विधानसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी च्या आग्रह राहणार आहे. कारण यापूर्वीही या दोन्ही मतदार संघात राष्ट्रवादी लढली आहे. सहाजिकच राष्ट्रवादी चा हक्क आहे. त्याच बरोबर विधानपरिषदेतील प्रलंबित १२ आमदारांचा नियुक्ती चा प्रश्न लवकरच सुटणार असल्याचा आशावाद त्यांनी बोलून दाखविला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आ.उदेसिंग पाडवी, डॉ.तुषार संनसे, डॉ.रामराव आघाडे, शहराध्यक्ष योगेश मराठे, बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी, डॉ. पुंडलिक राजपूत,उपस्थित होते.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी तळोदा शहरात अचानक भेट दिल्याने सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चलबीचल दिसून आली. त्यांनी पत्रकारांशी काय वार्तालाप केला याची उत्सुकताही पदाधिकाऱ्यांमध्ये दिसून आली. काहींनी त्याबाबत विचारणा ही केली. माजी नगराध्यक्ष भरत माळी व शहादा येथील सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनीही त्यांची शासकीय विश्रामगृहात सदिच्छा भेट घेतली.

बातमी शेअर करा
Previous Post

उद्यमशील सेवाभावी संस्थेतर्फे कायदेविषयक व्याख्यान

Next Post

हिंदूंमध्ये शौर्यजागरण करण्यासाठी श्री हनुमान जयंतीनिमित्त देशभरात 218 ठिकाणी ‘गदापूजन’

Next Post
हिंदूंमध्ये शौर्यजागरण करण्यासाठी श्री हनुमान जयंतीनिमित्त देशभरात 218 ठिकाणी ‘गदापूजन’

हिंदूंमध्ये शौर्यजागरण करण्यासाठी श्री हनुमान जयंतीनिमित्त देशभरात 218 ठिकाणी ‘गदापूजन’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add