म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील लोणखेडा येथे भारतीय जनता पार्टी तर्फे नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक मकरंद पाटील यांच्या प्रेरणेने व नंदुरबार जिल्हा महिला अध्यक्ष डॉ. किनंरी सोनार यांच्या मार्गदर्शखाली हनुमान जन्मोत्सव निमित्त कार सेवकांचा सतकार व सन्मान करण्यात आला.
सर्वप्रथम अशोक दशरथ पाटील कार सेवक यांचा सत्कार शरद ब्रिजलाल पाटील यांनी केला, सखाराम लक्ष्मण पाटील कार सेवक यांचा सत्कार भरत तुकाराम पाटील यांनी केला, किशोर नरोत्तम पाटील यांच्या सत्कार संजय देविदास पाटील यांनी केला. यावेळी अशोक पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले .त्यांनी सांगितले की, आम्हाला त्यावेळेस अडीचशे ते तीनशे किलोमीटर पायी चालावे लागले वाहनांना सरकारने बंदी आणली होती अनेक संकटांचा सामना करत आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो असे सांगितले. तद्नंतर डॉ भोजेंद्र
शिंदे यांनी कार सेवकांन विषयी आपले मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी भाजपा नंदुरबार जिल्हा सचिव संगीता पाठक, भाजपा चिटणीस बापू सोनार, दिलीप पाटील, तुकाराम दगडू पाटील, उत्तम गोपाळ, योगेश दामू, राजू टेलर, प्रवीण पाटील, कैलास पाटील, योगेश पाटील, उमेश पाटील, प्रवीण पाटील, महिला व पुरुष उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन घनश्याम पाठक यांनी केले.