Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात 248 उपकेंद्र व 58 प्राथमिक आरोग्य केंद्र व 3 नागरी आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतर, आरोग्यवर्धिनी दिन साजरा

team by team
April 16, 2022
in राज्य
0
जिल्ह्यात 248 उपकेंद्र व 58 प्राथमिक आरोग्य केंद्र व 3 नागरी आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतर, आरोग्यवर्धिनी दिन साजरा

नंदुरबार l प्रतिनिधी
आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी कार्यक्रमास 14 एप्रिल रोजी चार वर्ष पूर्ण झाले असून त्यानिमित्ताने केंद्र शासनाने दिलेल्या सूचनेनुसार 16 एप्रिल रोजी आरोग्यवर्धिनी दिन साजरा करण्यात आला. या वर्षी आरोग्यवर्धिनी दिनाची थीम इ संजीवनीच्या माध्यमातून आरोग्य वर्धिनी केंद्राच्या ठिकाणी टेलिकन्सलटेशन सेवा उपलब्धता ही आहे. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत आरोग्यवर्धिनी कार्यक्रम हा केंद्र शासनाचा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे.सद्यस्थितीत जिल्ह्यात 248 उपकेंद्र व 58 प्राथमिक आरोग्य केंद्र व 3 नागरी आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतर करण्यात आलेले आहे.
कार्यक्रमास आरोग्य केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री डॉ.भारती पवार यांनी सर्व उपस्थितांना झूम मिटींग व्दारे आरोग्यवर्धिनी केंद्राच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याशी प्रत्यक्ष वार्तालाभ करून कामकान जाणून घेत मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.

नंदुरबार जिल्ह्याचा जिल्हास्तरीय आरोग्यवर्धिनी कार्यक्रम जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी,आरोग्य सभापती अजित नाईक, सर्व सभापती, जिल्हाधिकारी श्रीम. मनीषा खत्री,मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यवर्धिनी केंद्र आष्टे येथे आयोजित करण्यात आला त्यात प्रमुख अतीथी खा. डॉ. हिना गावीत,आ. डॉ.विजयकुमार गावीत, आष्टे गटातील जिल्हा परिषद सदस्य देवमण पवार,कोळदा गटाचे जिल्हा परिषद सदस्य डॉ.सुप्रिया गावीत,आष्टे गणाचे पंचायत समिती सदस्य तथा पंचायत समिती उपसभापती कमलेश महाले,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद पंडित चौधरी, नंदुरबार तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जाफर तडवी,प्रा.आ.केंद्र आष्टे चे वैद्यकीय अधिकारी डॉ.गोपीन वळवी,डॉ. योगेश पाटील तसेच आष्टे गावातील प्रतिष्ठित नागरिक कर्मचारी वर्ग हजर होते.त्याच बरोबर नंदुरबार तालुक्यात नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र माळीवाडा, आरोग्यवर्धिनी उपकेंद्र लोय,आरोग्य वर्धिनी उपकेंद्र सिंदगव्हान, आरोग्यवर्धिनी उपकेंद्र नांदरखेडा,शहादा तालुक्यात आरोग्य वर्धिनी केंद्र प्रकाशा व आरोग्यवर्धिनी केंद्र पाडळदा,तळोदा तालुक्यात बोरद, अक्कलकुवा तालुक्यात आरोग्यवर्धिनी केंद्र खापर,नवापूर तालुक्यात आरोग्यवर्धिनी केंद्र चिंचपाडा येथे प्रातिनिधिक स्वरुपात तसेच जिल्ह्यातील 58 आरोग्यवर्धिनी केंद्र, 223 आरोग्यवर्धिनी उपकेंद्र व 3 नागरी आरोग्यवर्धिनी ठिकाणी स्थानिक जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य व पदाधिकारी यांचे उपस्थितीत कार्यक्रम साजरा करण्यात आला.केंद्र शासनाच्या सूचनेनुसार आलेल्या रुग्णांना टेलि कन्सलटेशनव्दारे आरोग्य सेवा उपलब्धता करून देण्यात आली. तसेच आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी कार्यक्रम निमित्त जिल्ह्यात खालील प्रमाणे आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 18 एप्रिल रोजी ग्रामीण रुग्णालय,म्हसावद ता. शहादा, 19 एप्रिल ग्रामीण रुग्णालय धडगाव, 20 एप्रिल रोजी उपजिल्हा रुग्णालय नवापूर, 21 एप्रिल ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा, 22 एप्रिल जिल्हा सामान्य रुग्णालय नंदुरबार, सदर ठिकाणी आरोग्यमेळाव्या निमित्त आरोग्य सेवा देण्यात येणार असून सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे अवाहन जिल्हाधिकारी श्रीम, मनीषा खत्री,मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद पंडित चौधरी यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

गावात उपद्रव करणाऱ्या माकडाला वनविभाग व वन्यजीव संरक्षण संस्था यांनी नैसर्गिक सोडले अधिवासात

Next Post

तळोदा शहरातील बालगृहात तीन मुलींचे अपहरण

Next Post
तऱ्हाडी ते परिवर्धा रस्त्यावर ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

तळोदा शहरातील बालगृहात तीन मुलींचे अपहरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add