नंदुरबार | प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती दिनानिमित्त शहरा सह जिल्ह्यात विवीध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, व संघटनांच्या वतीने अभिवादानासह प्रतिमा पूजन, ठिकठिकाणी मिरवणूक तसेच रॅली काढण्यात आली. १४ एप्रिलनिमित्त संपूर्ण शहरात निळ्यारंगाचे ध्वज, पताका, झालर लावण्यात आल्याने शहरात निळ्या वादळाचे उधाण आल्याचे दृश्य दिसून आले. दिवसभर कार्यक्रमात बालके व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
नंदुरबार येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.आंबेडकर पुतळयाजवळ सकाळी ९ वाजता सामूहिक बुध्दवंदना करण्यात आले. यावेळी डॉ.बाबासाहेब यांच्या पुतळयाला खा.डॉ.हिना गावीत, आ.डॉ.विजयकुमार गावीत, मा.आ.चंद्रकांत रघुवंशी नगराध्यक्षा सौ.रत्नाताई रघुवंशी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, माजी आ शिरीष चौधरी, उपनगराध्यक्ष कुणाल वसावेे, रसिकलाल पेंढारकर, अरुण रामराजे कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक, अश्विनी जोशी नितीन जगताप मधुकर पाटील राजेंद्र पाटील यांनी पुतळयास अभिवादन केले.यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनमित्त साक्री नाका परिसरात विशाल फाउंडेशन, अस्मिता फाउंडेशन व दलाई नामा फाउंडेशनतर्फे मोफत पाणी बॉटल वाटप करण्यात आली. यावेळी अश्विनी घोडरे, सुजाता अहिरे ,श्रीकांत अमृतसागर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.