नंदूरबार l प्रतिनिधी
आज १४ एप्रिल रोजी एकता टी हाऊस चिमठाणे येथे एका युवकाची बॅग राहिली होती त्या बॅगमध्ये सोनं असल्याचे पाहून त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या साळवे तसेच चिमठाणे येथील युवकांनी सदर व्यक्ती परत आल्यानंतर ती बॅग त्यांना परत केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तऱ्हावद ता. तळोदा येथील युवक मुकेश पाटील हे नोकरीनिमित्त पुणे या ठिकाणी राहतात. ते नेहमीप्रमाणे सुट्टीचा कालावधी असल्याने पुण्यावरून आपल्या गावाला म्हणजे तऱ्हावद ता. तळोदा या ठिकाणी यायला निघाले . धुळे येथे बराच उशीर झाल्याने त्यांनी एका हॉटेलवर थांबून जेवण केले. त्यानंतर ते परत आपल्या गाडीने गावाकडे निघाले असता चिमठाणे येथे एकता टी. हाउस या ठिकाणी थांबले आणि त्या ठिकाणी त्यांनी उसाचा रस घेतला. त्यानंतर ते लागलीच आपल्या गावाच्या दिशेने निघाले. परत निघते वेळी त्यांच्या जवळ असलेली पर्स त्याठिकाणी ते विसरून गेले. काही वेळानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या निंबा गिरासे, गौरव गिरासे, गणेश पाटील , अमोल भारती परेश कोळी, तुषार चौधरी भूषण पाटील या युवकांना ही बाब निदर्शनास आली त्यांनी ती बॅग उघडून पाहिली असता त्या बागेमध्ये ३ तोळे वजनाची सोन्याची चैन, त्याचबरोबर सोन्याची पोत तसेच रोख रक्कम असा ऐवज आढळून आला.त्यांनी त्याठिकाणी असलेल्या सोन्याच्या पावती वरून शहादा येथे संपर्क साधला असता शहादा येथील सोनाराने त्यांना माहिती दिली की, ही कच्ची पावती असल्याने आमच्या कडे त्यांचा कुठलाही प्रकारचा मोबाईल नंबर नाही.त्यामुळे आम्ही तो देऊ शकत नाही. मग या युवकांनी ठरवले की थोड्यावेळ यांची वाट पाहूया. पुढे गेल्यानंतर यांना लक्षात आल्यानंतर हे लागली या ठिकाणी परत येतील .आणि झालेही तसेच दोंडाईच्या या ठिकाणी पोहोचल्या नंतर मुकुंद पाटील यांची मुलगी तिच्या लक्षात ही बाब आल्यानंतर तिने आईला विचारले की, आई तुझ्या जवळ असलेली पर्स कुठे आहे तेव्हा आईच्या ही लक्षात आलं की पर्स कुठेतरी राहिली असावी. त्यामुळे ते एकता टी. हाऊस या ठिकाणी परत आले त्या ठिकाणी हे नवयुवक उपस्थित होते.
त्यांची वाटच ते पाहत होते त्यांनी त्या ठिकाणी आल्यानंतर त्या बाईचा रडका चेहरा पाहिल्यानंतर विचारले कि काय झाले त्यांनी मग त्या ठिकाणी आपली ओळख दर्शवली की, आम्ही तऱ्हावद येथे राहत असून माझे नाव मुकुंद पाटील आहे. आणि आम्ही एका तासापूर्वी या ठिकाणाहून रस पिऊन आमच्या गावा कडे निघालो होतो तेव्हा नजरचुकीने आमची पर्स या ठिकाणी राहिली आहे.आपणापैकी कोणाला ती सापडली असेल तर कृपया ती परत करा ही विनंती ऐकुन ओळख पटल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या युवकांनी त्यांना आधी ती संपूर्ण बॅग दाखवली त्या ठिकाणी त्यांचा ऐवज जशाचा तसा आहे का याबाबत खात्री केल्यानंतर ति त्यांना सुपूर्द केली.
यावेळी मुकुंद पाटील तसेच त्यांच्या पत्नी भाऊक झाल्या आणि त्यांनी उपस्थित युवकांना काही पैसे देऊ केले. पण त्या युवकांनी ते घेतले नाहीत. त्यांनी सांगितले की या ठिकाणी असलेल्या तीन लाख रुपये किमतीचे सोने आम्ही लपवू शकलो असतो. पण ते संस्कार आमच्यावर नाहीत .त्यामुळे आम्हाला पैसे नकोत. हे सर्व पाहून मुकुंद पाटील यांनी त्या युवकांना विनंती केली की माझ्या सोबत एक फोटो द्या जेणेकरून ही कायमस्वरूपी आठवण मला राहील तुमच्यासारखे लोकही या जगामध्ये आहेत जे आपला प्रामाणिकपणा या ठिकाणी सिद्ध करतात असे सांगून ते समाधानाने आपल्या गावी परत गेले.
त्यामुळे या प्रामाणिक पणाबद्दल निंबा गिरासे, गौरव गिरासे, गणेश पाटील , अमोल भारती परेश कोळी, तुषार चौधरी भूषण पाटील परिसरात नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
बातमी शेअर करा