नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरातील धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवती सहकारी बँक शाखा नवापूर अंतर्गत आदिवासी विकास संस्थेच्या सभासदाना कर्ज वाटपाची सुरुवात करण्यात आली.माजी जि.प अध्यक्ष भरत गावीत व बँकेचे संचालक अमरसिंग गावीत, विभागीय अधिकारी पी. जे. वळवी यांच्या हस्ते कर्ज वाटप करण्यात आले.
यावेळी माजी जि.प अध्यक्ष भरत गावीत म्हणाले की, बँकेने ३ लाखा पर्यत बिन व्याजी कर्ज ३१ मार्च पर्यत भरना केल्यास एक रुपया पण व्याज लागणार नाही याचा फायदा नवापूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवानी लाभ घेण्याचे आहवान केले.तसेत प्रधानमंत्री सुरक्षा वीमा योजना,प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व फामृत मोबाईल अँप घेण्याबाबतचे या नविन योजना सुरु करण्यात आल्या आहेत तरी या योजनेचा लाभ शेतकरी यांनी घ्याव्या.सदर योजना डी.डी.सी बँकेने सुरु केल्या बद्दल मी बँकेचे विशेष आभार मानतो.यावेळी बँकेचे संचालक अमरसिंग गावीत,बँकेचे विभागीय अधिकारी पी.जे. वळवी,बँक तपासनीस एन. टी. गावीत, रोखपाल मनोहर गावीत,बिलाजी करनकाळ,शाखा अधिकारी माया गावीत,नवापूर विकास संस्थेचे चेअरमन शिवदास कोकणी सह सर्व संचालक मंडळ व संस्थेचे सचिव सह इदालजी गावीत,शेतकरी सभासद आदी उपस्थित होते.