नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलतर्फे श्रीरामोत्सव उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
श्रीराम जन्मोत्सवानिमित्त दि.९ एप्रिल २०२२ रोजी संध्याकाळी ७ वाजता सुंदरकांडचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दि १० एप्रिल २०२२ रोजी श्रीराम मंदीरा पासून महिलांची मोटार सायकल रॅली काढण्यात आली.या रॅलीचा शुभारंभ नगराध्यक्ष हेमलता पाटील,उत्सव समितीचे अध्यक्ष अजय गावीत व उपाध्यक्ष किरण टिभे यांनी भगवा झेडा दाखवुन केला रँली मुख्य मार्गावरुन फिरुन श्रीराम मंदीरा जवळ सांगता करण्यात आली. या नंतर संध्याकाळी ५:३० श्रीराम मंदीरा पासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.या शोभायात्रेत श्रीराम,सीता,लक्ष्मण,हनुमान,देवमोगरा माता यांचा संजीव देखावा तयार करण्यात आला होता. शोभायात्रेत धडगाव भागातील आदिवासी बांधवांनी आदिवासी नृत्य सादर केले.तसेच चितवी गावाचा आदिवासी बांधवानी श्रीराम,सीता,हनुमान यांचा सजीव देखावा तयार करुन यावर नृत्य सादर केले.यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष अजय गावीत,उपाध्यक्ष किरण टिभे,विश्व हिंदू परिषद- बजरंग दलचे जिल्हा समरसता प्रमुख जगदीश जयस्वाल,जिल्हा धर्मप्रसार प्रमुख श्याम गावीत,राज सोनी,निलेश देसाई,आनंदराव वाघ,जिग्नेश पंचाल,महेंद्र नेरकर,हर्षल ओगले,राजेश गोसावी,पंकज हिंगु,अजित पाथरकर,प्रशांत ठाकरे,संजय सोनवणे,भिकु मावची,योगेश सोनार,विशाल गोसावी,पार्थ राणा,हिमेन सोनी,प्रीतेश जयस्वाल,अनिल दुसाने,राहुल पाटील,संदीप दुसाने,शंभू सोनार,कृष्णकांत पाटील,पियुष पाटील यांनी चांगले नियोजन केले.या कार्यक्रमात भारतीय जनता पाटीचे तालुका अध्यक्ष भरत गावीत,ललितभैया चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. शहरात भगवे ध्वज लावण्यात आले होते.या कार्यक्रमात भरत गावीत म्हणाले की, रामनवमी कोरोना महामारी नंतर प्रथमच मोठया उत्साहात साजरी होत आहे.प्रभु श्रीरामचंद्राने आपल्या सर्वाना कोरोना महामारी मध्ये सहीसलामत ठेवले. खरोखर श्रीरामचंद्राचे आपण आभार मानले पाहीजे.त्यांचामुळे हा सण साजरा करता येत आहे.नवापूर शहरात आपल्याला रामराज्य आणायचे असेल तर रामासारखे काम केले पाहीजे.तसे वागले ही पाहीजे.अशी आशा बाळगतो.या नंतर राज सोनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमात जि.प सदस्या संगिता गावीत,नगराध्यक्ष हेमलता पाटील,नगरसेवक महेद्र दुसाने,विशाल सांगळे,नगरसेविका अरुणा पाटील,माजी नगरसेविका सारीका पाटील,भाजपचे जिल्हासरचिटणीस राजेंद्र गावीत,अल्पसंख्याक विकास प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख,शिवसेना जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील,माजी नगरसेवक अजय पाटील,प्रकाश पाटील,गणेश वडनेरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचलन नारायण मराठे यांनी केले.या प्रसंगी मेनरोड वरील जुनी जि.प कन्या शाळे समोर भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष भरत गावीत यांचा तर्फे शोभायात्रेत आलेल्या भाविकांना शरबत वाटप करण्यात आले.यानंतर श्रीरामाची शोभायात्रा काढून सरदार चौक,मेनरोड,लाईट बाजार,टर्नल प्लाँट,शिवाजी रोड येथे फिरुन श्रीराम मंदीरा जवळ सांगता करण्यात आली.या नंतर भव्य असा महाप्रसादाचे(भंडारा) आयोजन श्रीराम मंदीरा जवळ करण्यात आले होते.कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर,सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ, उपनिरीक्षक अशोक मोकळ,मनोज पाटील,पोहेका प्रेम जाधव,निजाम पाडवी,पवन राजपूत,विकास पाटील,पंकज सुर्यवंशी,विकी वाघ,दादाभाई वाघ यांनी चोख बदोबस्त ठेवला होता.