नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हयाच्या सातपुडा पर्वताच्या दुसऱ्या रांगेत आणि अतिदुर्गम भागात वसलेले तिनसमाळ गाव. गावात कोणतीही मूलभूत सुविधा नाही, पिण्याचा पाण्याची सोय नाही, रस्ता कच्चा आणि कागदावर पूर्ण अश्या करणांमुळे दि. 2 एप्रिल 2022 रोजी तिनसमाळ ग्रामस्थ व शेलदा ग्रामस्थ मिळून तिनसमाळ येथे आमरण उपोषणास बसले होते.गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेले उपोषण
पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या आश्वासनानंतर दहाव्या दिवशी मागे घेण्यात आले.
सातपुडा दुर्गम भागातील तिनसमाळ ग्रामस्थ मूलभूत सुविधा तसेच गावाचे पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी गेल्या दहा दिवसांपासून गावातच आमरण उपोषण सुरू बसले होते. अखेर जिल्हाधिकारी व पालकमंत्री ॲड.के. सी. पाडवी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी ग्रामस्थांना गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न तसेच सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्या उपस्थितीत तानाजी पावरा यांच्यासह ग्रामस्थांनी आमरण उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले आहे. याबाबत पालक मंत्री के सी पाडवी यांनीही गावाचे पुनर्वसन व विकासासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे माहिती दिली आहे.








