Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पानिपत युद्धातील मराठा सैनिकांच्या स्मारकासाठी योग्य ते सहकार्य करण्याचे लोकसभेच्या अध्यक्षांचे प्रशासनाला निर्देश : डॉ. नीलम गोऱ्हे यांनी माहिती

team by team
April 11, 2022
in राष्ट्रीय
0
पानिपत युद्धातील मराठा सैनिकांच्या स्मारकासाठी योग्य ते सहकार्य करण्याचे लोकसभेच्या अध्यक्षांचे प्रशासनाला निर्देश : डॉ. नीलम गोऱ्हे यांनी माहिती

नवी दिल्ली-
पानिपतच्या ऐतिहासिक युद्धातील मराठा सैनिकांच्या स्मारकाचा विकास करण्यासाठी योग्य ते सहकार्य करण्याबाबत पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश लोकसभेचे अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांनी लोकसभा भवनात दिले असल्याची माहिती विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.
महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
पानिपत युद्ध स्मारक, त्याचबरोबर पानिपत येथील मराठा स्मारकाच्या विकासाबरोबरच महाराष्ट्रातील लेण्याद्री, एकवीरा देवीच्या मंदिर परिसरात करावयाच्या सोयी-सुविधा बाबत पुरातत्व खात्याने तात्काळ कार्यवाही करण्याविषयी त्यांनी निर्देश दिल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. विधान मंडळाच्या सदस्यांना रेल्वे प्रवास करीत असताना आवश्यक त्या सोयी सुविधा मिळाव्यात याबाबतही लोकसभा अध्यक्षांना डॉ. गोऱ्हे यांनी निवेदन दिले. लोकसभा अध्यक्षांनी यावर त्वरित सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित मंत्रालयाशी संवाद साधून योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. याबद्दल डॉ गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले आहे.यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी अध्यक्ष महोदयांना महाराष्ट्र भेटीचे निमंत्रणही दिले.
या बैठकीला महाराष्ट्राच्या विधी व न्याय विभागाच्या राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत, महेंद्र काज, रवींद्र खेबुडकर, राजेश तार्वी, अनिल महाजन, मकरंद पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

युवक-युवतींनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्यावा

Next Post

पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या आश्वासनानंतर तिनसमाळ ग्रामस्थांचे आमरण उपोषण दहाव्या दिवशी मागे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add