Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा तालुक्यातील येथे एकाच कुटुबातील तीघांची आत्महत्याप्रकरणी दोघा महिलांना अटक

team by team
August 1, 2021
in क्राईम
0
शहादा तालुक्यातील लोंढरे येथे एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

नंदुरबार | प्रतिनिधी

शहादा तालुक्यातील लोंढरे येथील एका शेतकरी कुटूंबातील आई, वडील व मुलाने तापी नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली होती. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी व सासूस अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहादा तालुक्यातील लोंढरे येथील राधिका गोपाल वाघ या संशयीत आरोपीने तिचा पती गोपाल वाघ याच्याशी वेळोवेळी भांडण करून शिवीगाळ करून दमदाटी केली. यासह गोपाल वाघ याची आई सकुबाई यांना हाताबुक्यांनी मारहाण केली. याला कंटाळून गोपाल नथा वाघ, नथा बुधा वाघ व सखुबाई नथा वाघ तिघे रा.लोंढरे (ता.शहादा) यांनी दि.२२ जुलै रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास शिंदखेडा तालुक्यातील सुखवद येथे तापी नदीच्या पात्रात उडी मारून आत्महत्या केली. या घटनेत गोपाल नथा वाघ यांच्या मृतदेह मिळून आला आहे. मात्र त्याचे आई, वडील यांचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी संजय नथा वाघ रा.लोंढरे (ता.शहादा) यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात मयत गोपालची पत्नी राधिका गोपाल वाघ रा.लोंढरे (ता.शहादा) व सासूबाई कमलबाई हिंमत खलाणे रा.सोनवद (ता.शहादा) यांच्या विरूध्द भादंवि कलम ३०६, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून दोघ संशयीत आरोपी राधिका गोपाल वाघ व कमलबाई हिंमत खलाणे यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास विक्रांत कचरे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

म्हसावद येथून साडे पाच लाखाच्या स्पीरीटसह ६ लाखाची कार जप्त,दोघांविरूध्द गुन्हा, एकास अटक

Next Post

नकली सोने विकणारी राजस्थानची टोळी गजाआड, साडे सहा लाखांची रोकड जप्त

Next Post
नकली सोने विकणारी राजस्थानची टोळी गजाआड, साडे सहा लाखांची रोकड जप्त

नकली सोने विकणारी राजस्थानची टोळी गजाआड, साडे सहा लाखांची रोकड जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add