नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील नवी भोई गल्ली बालवीर चौक परिसरात 25 वर्षानंतर पुन्हा कानुमाता उत्सवानिमित्त बाहेरो लग्न सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कुलस्वामिनी जोगेश्वरी मातेच्या कृपेने आदिशक्ती महाकाली का कानबाई मातेचा महाप्रसाद आणि सामुदायिक बाहेर लग्न सोहळा रविवार दि. 10 एप्रिल रोजी सायंकाळी गोरज मुहूर्तावर आयोजित केले आहे.उद्या शुक्रवार दिनांक 8 एप्रिल सप्तमी रोजी सकाळी 9 ते 11 देव आणणे दुपारी 4 ते 5 रास पूजने रात्री 8 ते 9 माल दळणे , शनिवार दिनांक 9 रोजी अष्टमीला सकाळी 8 ते 9 पाणी दिवा आणणे, कस्तुरी व रत्ने आणणे, दुपारी 4 ते 7 मातेची मिरवणूक व स्थापना, रविवार दि. 10 नवमी रोजी सकाळी 9 ते 11 भोजनाचा स्वयंपाक, दुपारी 4 ते 5 गोरखनाथांची फेरी, 6 ते 7 मातेचा थाट, कानुमाता लग्न सोहळा, होईल त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात येईल.सोमवार दि. 11 दशमी रोजी कानुमाता ची मिरवणूक आणि विसर्जन होईल.सर्व धार्मिक कार्यक्रम बालवीर चौक नवी दिल्ली परिसरात होईल पूजेसाठी वैंदाने येथील भगत नारायण पाटील तर गवरणी म्हणून, सैताने तील कल्पना शिंदे आहेत.भाविकांनी कानुमाता उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संयोजक श्रीमती बेबीबाई विठ्ठल चौधरी तसेच रमण मोतीराम चौधरी, नारायण मोतीराम चौधरी, मनोहर मोतीराम चौधरी, प्रभाकर मोतीराम चौधरी, दिलीप भटु चौधरी, तसेच विनोद विठ्ठल चौधरी आणि व्यवहारे परिवार यांनी केले आहे.