Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथील व्यापार्‍याचे चारचाकी वाहनातुन पैसे चोरणार्‍या ४ आरोपीतांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ठोकल्या बेड्या

Mahesh Patil by Mahesh Patil
July 31, 2021
in क्राईम
0
तळोदा येथील व्यापार्‍याचे चारचाकी वाहनातुन पैसे चोरणार्‍या ४ आरोपीतांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ठोकल्या बेड्या

नंदुरबार | प्रतिनिधी
तळोदा येथील व्यापार्‍याचे चारचाकी वाहनातुन १ लाख १० हजार रुपये पैसे चोरणार्‍या ४ आरोपीतांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.५ जुलै रोजी सकाळी ९ वा. सुमारास तळोदा येथील किराणा मालाचे व्यापारी हुकुमचंद घिसुमल जैन रा. मेनरोड तळोदा हे त्यांच्या चारचाकी वाहनाने तळोदा येथुन खापर व अक्कलकुवा येथुन त्यांन दिलेल्या मालाचे पैसे घेवुन निघाल्यानंतर अक्कलकुवा येथील आमलीबारी फाट्याजवळ पंक्चर दुकानावर जावुन त्याच्याशी बोलत असतांना अज्ञात इसमांनी हुकुमचंद जैन यांच्या गाडीतील रेग्जीनच्या बॅगमध्ये ठेवलेले १ लाख १० हजार रुपये रोख चोरुन नेले म्हणून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात हुकुमचंद घिसुमल जैन यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कोरोना महामारीमुळे व्यापार्‍यांची हालाखीची परिस्थीती होती, त्यातच व्यापार्‍याचे दिवसा १ लाख १० हजा रुपये चोरी झाल्यामुळे व्यापारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले होते, त्याअनुषंगाने  पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचेसोबत घडलेल्या घटनेबाब गांभीर्याने चर्चा करुन गुनहा उघडकिस आणुन गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्या बाबत निर्देश दिले.वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमक यांनी या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन अन्वेषण शाखेचे पथक तयार करुन गुन्हा उघडकिस आणणेबाबत मार्गदर्शन करुन स्वत:ही आपल्या बातमीदारांमार्फत व जेलमधुन सुटुन आलेले व पॅरोल रजेवर आलेल्या मालमत्तेविरुध्दच्या गुन्हेगारांची माहिती काढत होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदार यांचे सहाय्याने लक्कडकोट येथुन सुनिल खारक्य पाडवी रा. लक्कडकोट ता.तळोदा यास शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयीत इसमा कडे विचारपुस केली असता, त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार रणजित रतिलाल वळवी, युवराज करमसिंग वळवी दोन्ही रा. लक्कडकोट ता. तळोदा , वसंत शेगा पावरा रा. रोझवा पुनर्वसन यांचे मदतीने केली असल्याची हकिगत कळविल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सर्व आरोपीतांना गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वाहनांसह ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी देखील गुन्हा केल्याचे कबुल केल्याने सर्व आरोपीतांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच गुन्ह्यात चोरीस गेले रोख रुपये देखील लवकरात लवकर आरोपीतांकडुन हस्तगत करण्यात येतील असे पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी कळविल आहे.
सदरची कामगि विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-अधीक्षक (गृह) देवराम गवळी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक  रविंद्र कळमकर, असई अनिल गोसावी, पोलीस हवालदार सजन वाघ, मुकेश तावडे, पोलीस नाईक विशाल नागरे, सुनिल पाडवी, बापु बागुल, मनोज नाईक यांचे पथकाने केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यातील दिव्यांगांच्या समस्या सोडवा, महात्मा फुले अपंग विकास सेवाभावी प्रतिष्ठानतर्फे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना दिले विविध मागणीचे निवेदन

Next Post

आश्रमशाळेतील इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग २ ऑगस्ट पासून होणार सुरु

Next Post

आश्रमशाळेतील इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग २ ऑगस्ट पासून होणार सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आदिवासी आश्रमशाळेत नवीन वेळापत्रक लावू नये,जुनेच वेळापत्रक कायम ठेवण्याची बिरसा फायटर्सची मागणी

आदिवासी आश्रमशाळेत नवीन वेळापत्रक लावू नये,जुनेच वेळापत्रक कायम ठेवण्याची बिरसा फायटर्सची मागणी

May 31, 2023
तापी नदी परिसराची स्वच्छता,श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नंदुरबारचा पर्यावरण पूरक उपक्रम

तापी नदी परिसराची स्वच्छता,श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नंदुरबारचा पर्यावरण पूरक उपक्रम

May 31, 2023
अरे व्वा : वर्षाकाठी शेतकऱ्यांना मिळणार १२ हजार रुपये

अरे व्वा : वर्षाकाठी शेतकऱ्यांना मिळणार १२ हजार रुपये

May 31, 2023
केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ; लाखो शेतकऱ्यांना दिलासा

केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ; लाखो शेतकऱ्यांना दिलासा

May 31, 2023
माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांना मातृशोक

माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांना मातृशोक

May 30, 2023
अक्कलकुवा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जिल्हास्तरीय बैठक उत्साहात

अक्कलकुवा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जिल्हास्तरीय बैठक उत्साहात

May 30, 2023

एकूण वाचक

  • 5,503 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group