नंदूरबार l प्रतिनिधी
रिपब्लीकन एम्प्लॉईज फेडरेशन ही तमाम अधिकारी व कर्मचारी यांच्या हक्कासाठी लढणारी व विविध सामाजिक कार्यात अग्रणी असणारी संघटना आहे. ना. रामदास आठवले, संस्थापक अध्यक्ष रिपब्लीकन एम्प्लॉईज फेडरेशन यांच्या मार्गदर्शनाने व कार्यकुशल नेतृत्वाने हे संघटन कार्यरत असून नंदुरबार जिल्ह्यात सन 2022-23 च्या वार्षिक सभासद नोंदणी अभियानाची सुरूवात एप्रिलमध्ये सुरू करण्यांत आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पत्रकार, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडीया, कुशल-अकुशल, शासकीय निमशासकीय, कंत्राटी, अंशकालीन, सेवाकरार (कॉन्ट्रॅक्टबेस), कंपनी कर्मचारी, अधिकारी यांना सभासद होण्याचे आवाहन करण्यांत येत असून त्यांच्या समस्या व समाधानाकरीता रिपब्लीकन एम्प्लॉईज फेडरेशन, नंदुरबार जिल्ह्याच्या अधिकृत ई-मेल ref.nandurbar@outlook.com वर संपर्क करण्यांचे रिपब्लीकन एम्प्लॉईज फेडरेशन, नंदुरबार जिल्हा कार्यकारीणीव्दारे आवाहन रिपब्लीकन एम्प्लॉएज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष रत्नाकर पाटील यांनी केले आहे.