नंदुरबार ! प्रतिनिधी
महात्मा फुले अपंग विकास सेवाभावी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना जिल्ह्यातील दिव्यांगाच्या विविध मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, दिव्यांग यांना स्वयंरोजगार करता यावा म्हणून 200 स्केअर फुट जागा व तयार गाळे मागणी व कोठ्या प्रमाणे त्वरित उपलब्ध करून द्यावे. तसेच दिव्यांग यांना घरकुल मिळण्यास सर्व स्तरावरून उदासीनता दिसून येत आहे तरी या बाबत जिल्हाधिकारी यांनी या विषयात लक्ष घालून दिव्यांगणा त्वरित सर्वप्रकारचे घरकुले योजनांमध्ये सामिल करून घरे त्वरित उपलब्ध करून द्यावेत तसेच दिव्यांगांच्या नोकरीतील शासकीय व निमशासकीय विभागातील तीन टक्के आरक्षणाचा शोध घेऊन आरक्षण त्वरित भरण्यात यावे. दिव्यांग व विशेष ग्रामसभा च्या आयोजनाचे आदेश देण्यात यावे जेणेकरून स्थानिक प्रश्न दिव्यांगाना मांडता येतील,जसे की घरकुल योजना, संजय गांधी योजना याच्या लाभार्थ्यांवर सोबत चर्चा करून लाभ मिळेल तसेच दिव्यांग यांना जिल्हा रुग्णालयात अपंगाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी आठवड्यातून एकच दिवस उपलब्ध असून आठवड्यातून किमान दोन दिवस तरी अपंगांचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी मिळावा अशा विविध मागण्यांसंदर्भात महात्मा फुले अपंग विकास सेवाभावी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष विनोद अहिरे व त्यांचे सहकारी यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन देताना ईश्वर हरि रोकडे, देवकाबाई देवरे, मनोहर शामराव भदाणे, शेषराव भिमराव बोरसे,निर्मलाबाई शिरसाठ, विजय भाईदास पाटील,पांडुरंग सोनु देवरे, विठ्ठल ठाकूर, धनराज पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचा सर्वप्रथम सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले व शासनस्तरावरून जिल्ह्यातील दिव्यांग यांच्या विविध योजनांचे त्वरित अंमलबजावणी करावी व दिव्यांग बांधवांना त्यांचे हक्क मिळवून
द्यावेत अशी मागणी यावेळी संस्थेचे संस्थापक विनोद अहिरे यांनी केली. जिल्हाधिकारी यांनी या बाबत सकारात्मक चर्चा करून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.