Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बामखेडा येथे आगीपासून गव्हाचे पीक वाचवण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू

team by team
April 4, 2022
in क्राईम
0
बामखेडा येथे आगीपासून गव्हाचे पीक वाचवण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील बामखेडा त.त. येथे आगीपासून गव्हाचे पीक वाचवण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहादा तालुक्यातील बामखेडा त.त.येथील मयत शेतकरी संजय एकनाथ चौधरी (वय 56 ) व त्यांचे मोठे बंधु रोहिदास एकनाथ चौधरी हे दोघे भाऊ त्यांच्या शेतात हजर असताना त्यांच्या शेतालगत असलेले देविदास उर्फ गणेश उखा पटेल यांचे शेत गट नं. 124 ज्यात उसाची लागवड केली आहे, सदर शेतीच्या वरून विद्युत वाहिनी (इलेक्ट्रिक लाईन) गेलेली असून त्याच्या शॉर्टसर्किटमुळे उसाला अचानक आग लागली. बाजूला संजय चौधरी व रोहिदास चौधरी यांचा गव्हाची लागवड असलेले शेत गट नं. 129 मधील संजय एकनाथ चौधरी हे गहू पिकाला आग लागू नये म्हणून उसात लागलेली आग विझविण्याचा प्रयत्नात होते, परंतु सदर आगीने रौद्र रूप धारण केल्याने उसाच्या शेतात ते अडकून पडले त्यामुळे त्यांच्या आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी गावातील पोलीस पाटील डॉ योगेश चौधरी , सरपंच मनोज चौधरी व सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीसांनी भेट देत घटनेची माहिती घेत पंचनामा केला. संजय चौधरी हे पीक संरक्षण सोसायटीचे माजी चेयरमन होते त्यांच्या पश्चात भाऊ, वहिनी, पुतणे असा परिवार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथे नाशिकच्या पथकाने कॉपी प्रकरणी दोन विद्यार्थ्यांवर केली कारवाई

Next Post

नंदुरबारहुन पुणे पंढरपूरसाठी बस सुरू

Next Post
नंदुरबारहुन पुणे पंढरपूरसाठी बस सुरू

नंदुरबारहुन पुणे पंढरपूरसाठी बस सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add