Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांना वयाचा दाखला स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रातच उपलब्ध करून द्यावा:पंचायत समितीच्या बैठीकीत सर्वानुमते ठराव मंजूर

team by team
April 3, 2022
in राजकीय
0
संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांना वयाचा दाखला स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रातच उपलब्ध करून द्यावा:पंचायत समितीच्या बैठीकीत सर्वानुमते ठराव मंजूर

म्हसावद l प्रतिनिधी
संजय गांधी योजने अंतर्गत येणाऱ्या विविध पेन्शन योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या वयाचा दाखला हा केवळ शहादा तालुक्यातील म्हसावद येथेच उपलब्ध न करून देता तो दाखला तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपलब्ध करून द्यावा.जेणे करून जेष्ठ नागरिक,विधवा,अपंग आदी लाभार्थ्यांना परेशानी व आर्थिक भूदंड न होता त्यांचा वेळ व पैसा वाचेल.अशी मागणी काही सदस्यांनी नुकत्याच झालेल्या शहादा पंचायत समितीच्या मासिक मिटिंगमध्ये उचलून धरली.त्या अनुषंगाचा ठराव करण्यात येऊन सर्वानुमते सभेत मंजूर करण्यात आला.
सविस्तर माहिती अशी की,संजय गांधी योजने अंतर्गत ज्या जेष्ठ,विधवा,अपंग आदी लाभार्थ्यांना वयाचा दाखला आवश्यक असतो अशा लाभार्थ्यांना वयाचा दाखला मिळविण्यासाठी शासकीय स्तरावरून म्हसावद(ता.शहादा)येथील ग्रामीण रुग्णालयात सोय करण्यात आली आहे.त्यासाठी आठवड्यातून एक दिवस व एक वैद्यकीय अधिकारी निश्चित करण्यात आला आहे.परंतु बऱ्याचदा त्या दिवशी सुटीचा दिवस येऊन जातो किंव्हा संबंधित वैद्यकीय अधिकारी शासकीय वा खासगी अशा काही ना काही कारणास्तव रुग्णालयात उपस्थित राहत नाही.बिचाऱ्या लाभार्थ्यांना याबाबत कोणतीही पूर्व कल्पना मिळत नसल्याने तालुक्यातील कानाकोपऱ्यातून म्हसावद ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या लाभार्थ्यांना मात्र मोठ्या परेशानीला सामोरे जावे लागत आहे.हे लाभार्थी आधीच अशिक्षित,वयोवृद्ध,विधवा,अपंग असल्याने त्यांना इतरांचा सहारा घेऊन म्हसावद येथे यावे लागते आणि येथे येऊन जर संबंधित अधिकारीच उपस्थित नसल्यास त्यांना मोठा आर्थिक,मानसिक,शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.अशी एकंदरीत परिस्थिती बऱ्याच वर्षांपासून सूरू असल्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी हा वयाचा दाखला स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध व्हावा अशी मागणी तालुक्यातील वेगवेगळ्या भागातील लोकप्रतिनिधिंकडे केली.त्यानुसार नुकत्याच झालेल्या शहादा पंचायत समितीच्या मासिक सभेत पंचायत समिती सदस्यांनी हा विषय सभेपुढे उचलून धरला.विषयाचे गांभीर्य पहाता या विषयास सर्वानुमते मान्यता देऊन तात्काळ ठराव करण्यात आला. त्याबाबतचे निवेदन गट विकास अधिकारी डॉ.राघवेंद्र घोरपडे यांना देण्यात आले.यावेळी सभापती बायजाबाई भिल,उपसभापती वैशाली पाटील,पं.स.सदस्या रोहिणी पवार,भानुमती ईशी,चंदन पानपाटील,संगीता पाटील,निमा पटले,कमलबाई ठाकरे,रमणबाई पवार,ललिता शेवाळे,रंगीलीबाई पावरा, सरला ठाकरे,ललिता बाविस्कर,रत्नाबाई पवार,अरुणा भिल,सत्येन वळवी,गोपी पावरा,विजयसिंग पावरा,गणेश पाटील,किशोर पाटील,श्रीराम याईस,जयसिंग माळीच,प्रकाश पावरा,विरसिंग ठाकरे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

राणीपूर येथे महिला मेळावा व आरोग्य शिबिर उत्साहात

Next Post

सुरज केसरी नगरात माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते साईबाबा मंदिराचे भूमिपूजन

Next Post
सुरज केसरी नगरात माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते साईबाबा मंदिराचे भूमिपूजन

सुरज केसरी नगरात माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते साईबाबा मंदिराचे भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add