नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार येथे पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीच्या विरोधात युवासेनेतर्फे गाजर दिखावो आंदोलन करण्यात आाले.
यावेळी निवेदनात म्हटले आहे की, पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे महाराष्ट्रात पेट्रोलचे भाव १२० रुपये तर डिझेल ९८ रुपयांच्या जवळपास आहे. केंद्र सरकारने अच्छे दिन आणण्याची स्वप्न दाखवून गोरगरीब जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. याच्या विरोधात आज नंदुरबार जिल्हा युवासेनेच्या वतीने युवासेना जिल्हाप्रमुख अर्जुन मराठे यांच्या नेतृत्वाखाली दीनदयाल चौकात गाजर दिखावो आंदोलन आंदोलन करण्यात आले. तसेच केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच महागाईच्या विरोधात गाजर दाखवून निषेध करण्यात आला.यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख अर्जुन मराठे,उपजिल्हाप्रमुख रविंद्र गिरासे,शहर प्रमुख राजधार माळी, नगरसेवक गजेंद्र शिंपी, युवासेना जिल्हा सचिव दिनेश भोपे, शहर अधिकारी दादा कोळी ,शिवसेना शाखा प्रमुख दिग्विजय पाटील, लखन माळी, आनंद पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








