Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती विरोधात युवती सेनेचे थाळी नाद आंदोलन

team by team
April 3, 2022
in राजकीय
0
पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती विरोधात युवती सेनेचे थाळी नाद आंदोलन

नंदुरबार | प्रतिनिधी
पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती विरोधात नंदुरबार येथे थाळी वाजवून व एकमेकांना मिठाई वाटून युवती सेनेतर्फे आंदोलन करण्यात आले.

यावेळी निवेदनात म्हटले आहे की, पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे. संपूर्ण भारतात आज पेट्रोल शंभरीच्या पार गेले आहे .महाराष्ट्रात पेट्रोलचे भाव १२० रुपये तर डिझेल ९८ रुपयांच्या जवळपास आहे. केंद्र सरकारने अच्छे दिन आणण्याची स्वप्न दाखवून गोरगरीब जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. केंद्र सरकारच्या विरोधात आज नंदुरबार जिल्हा युवती सेनेच्या वतीने पेट्रोलपंपाबाहेर आंदोलन करण्यात आले. तसेच केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्रसरकारने गोरगरिबांना अच्छे दिन आणण्याचे स्वप्न दाखवले होते परंतु ते अच्छे दिवस अजून आलेच नाहीत . मोदी सरकारने महागाई चा आगडोब पसरवला आहे त्यात सर्व सामान्य जनता होरपळून गेली आहे .म्हणून नंदुरबार युवती सेनेच्या वतीने केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात आज थाळी वाजवून व एकमेकांना मिठाई वाटून आंदोलन करण्यात आले .यावेळी युवती सेनेच्या जिल्हाध्यक्ष मालतीताई वळवी, भारती ठाकरे,रीना वसावे, रीना पाडवी, रमिला वसावे, मनुबाई सोनवणे, वैशाली सोनवणे,दिव्या सोनवणे, पूनम वळवी, प्रियंका वळवी, व युवती सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीच्या विरोधात युवासेनेतर्फे गाजर दिखावो आंदोलन

Next Post

राणीपूर येथे महिला मेळावा व आरोग्य शिबिर उत्साहात

Next Post
राणीपूर येथे महिला मेळावा व आरोग्य शिबिर उत्साहात

राणीपूर येथे महिला मेळावा व आरोग्य शिबिर उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add