Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे केंद्र सरकारचा निषेध

team by team
April 2, 2022
in राजकीय
0
महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे केंद्र सरकारचा निषेध

नंदुरबार l प्रतिनिधी
पेट्रोल, डिझेल व घरगुती एलपीजी गॅसच्या विक्रमी दरवाढीने सर्वसामान्य जनता महागाईने होरपळली जात असताना, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने केंद्रातील मोदी प्रणित भाजप सरकारच्या निषेधार्थà शहरातील सुभाष चौकात निदर्शने करण्यात आली.
राष्ट्रवादी युवक कांग्रेस प्रदेश अध्यक्ष मेहबूब भाई शेख यांच्या आदेशान्वये, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व नंदुरबार प्रभारी सत्यजित सिसोदे यांच्या सहमतीने तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे नंदुरबार जिल्ह्यासह शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते ऍड.राऊ दिलीपराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारचा निषेध नोंदवित आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, राष्ट्रवादीचे नंदुरबार शहराध्यक्ष नितिन जगताप, तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, युवक शहरध्यक्ष लल्ला पहेलवान मराठे, युवक तालुकाध्यक्ष सुरेश वळवी, शहर उपाध्यक्ष लल्ला बागवान, युवक संघटक जितेंद्र ठाकरे, शहर कार्याध्यक्ष कालू शाह, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष बबलु कदमबाड़े, महिला जिल्हाध्यक्षा अश्विनी जोशी, उषा तायडे, निलेश चौधरी, राकेश राजपूत, अदनान मेमन, राजा ठाकरे, प्रमोद महाजन, अमोल पिंपळे, रूपेश जगताप, दिनेश माळी आदी राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे शहर व तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
केंद्रातील भाजप सरकारने पेट्रोल, डिझेल, घरगुती एलपीजी गॅसचे दर वाढवून संपुर्ण देशात महागाईचा भडका उडविला आहे. २०१४ पासून सत्तेवर आलेल्या मोदीप्रणीत भाजप सरकारने महागाई कमी करण्याऐवजी मोठ्या प्रमाणात महागाई करुन ठेवली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढले असून, सर्वसामान्य नागरिकांना जगणे देखील अवघड झाले आहे. इंधनवर केंद्र सरकारने विविध कर लादल्याने महागाई कमी होण्यास तयार नाही. यामुळे महागाईचा आगडोंब उसळला असल्याचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे स्पष्ट करण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

जनताच राजकीय नेत्यांना निवृत्त करू शकते : माजी आ.चंद्रकांत रघुवंशी

Next Post

डॉ.वर्षा फडोळ यांची नाशिक जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्यकार्यकरी पदी बदली

Next Post
डॉ.वर्षा फडोळ यांची नाशिक जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्यकार्यकरी पदी बदली

डॉ.वर्षा फडोळ यांची नाशिक जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्यकार्यकरी पदी बदली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add