नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील डोंगरगाव शिवारात एका झाडावर दोन तरुणांचे मृतदेह गळफास घेतलेल्या परिस्थितीत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान याबाबत ओळख पटविण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक दिपक बुधवंत यांनी केले होते.त्या युवकांची ओळख पटली असून ते शहादा तालुक्यातील वडगाव येथील असून
ते मामा-भाचे असल्याचे उघड झाले.

शहादा तालुक्यातील डोंगरगाव शिवारात तालुक्यातील वडगाव येथील दोन युवकांचे मृतदेह काळ्या केबलच्या साह्याने झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले होते. सदर युवकांचे मृतदेह तीन चार दिवसापासून त्याठिकाणी लटकलेले असावेत म्हणून अतिशय कुजलेल्या अवस्थेत आढळून आले म्हणून दोन्ही मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाले होते परंतु आज पोलीस सूत्रांना मिळालेल्या माहितीनुसार सदर युवक शहादा तालुक्यातील वडगाव येथील रहिवासी असून विशाल गोसावी व सचिन गोसावी अशी त्यांची नावे आहेत, हे दोन्ही युवक मामा भाचा असल्याचेही समजते तसेच हे युवक शहादा लोणखेडा रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये काम करत असल्याचे समोर आले आहे ,या दोन्ही युवकांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला असून तो व्हायरल झाला आहे.
आपको कैसे भूल सकते है ,आपने तो हमारा दिल दुखाया है
त्या व्हिडीओत त्यांनीअसे म्हटले असून ज्या ठिकाणी युवकाने आत्महत्या केली आहे त्याच ठिकाणी झाडाजवळ बसून हा व्हिडिओ चित्रित केला आहे, त्यातील एका युवकाने आत्महत्येसाठी वापरलेली वायर गळ्यात टाकलेली दिसतेय, परंतु हा व्हिडिओ नेमका कधी बनवलाय व कुणाला उद्देशून बनवला आहे हे अद्याप कळू शकलेले नाही. सध्या तरी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अद्याप या युवकांनी गळफास का घेतला? नेमके कारण काय? हे समोर आलेले नाही सध्यातरी व्हिडिओच्या आधारे या दोन्ही युवकांनी आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली असावी असा प्राथमिक अंदाज येतो परंतु सदर घटनेची पाळेमुळे खोदून नेमका प्रकार काय आहे ?याविषयी पोलीस प्रशासन चौकशी करत असून नेमकी हत्या की आत्महत्या? याविषयी लवकरच उलगडा होणार अशी माहिती मिळते .याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत करित आहे.








