नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरातील हरीलीला कॉम्प्लेक्स येथे विश्व हिदु परिषद बजरंग दलतर्फे श्रीरामोत्सव समिति कार्यालयाचे उद्घाटन भारतीय जनता पाटीचे तालुका अध्यक्ष भरत गावीत, तहसिलदार मंदार कुलकर्णी,पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर नगराध्यक्षा सौ.हेमलता पाटील,अजय गावीत यांचा हस्ते श्रीरामाच्या मुर्तीचे पुजन करुन दिप प्रज्वलन करुन करण्यात आले.
.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष भरत गावित यांनी आपल्या मनोगतात म्हणालेकी श्री राम संपूर्ण भारतातील हिंदू बंधवा करीता अतिशय आस्थेचा विषय असून रामनवमी संपूर्ण भारतात अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरी होते.नवापुर येथे सुद्धा रामनवमी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा व्हावा, या वर्षाच्या रामनवमी उत्सवात सांस्कृतिक धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे नियोजन करून शहराची सेवा कशी चांगली करत येईल याबबत नियोजन करून उत्सव साजरा झाला पाहिजे.या उत्सवात सर्वांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन करीत मोलाचे मार्गदर्शन केले.
रामनवमी उत्सव यावर्षी नियोजनबद्ध तयारी करून आगळ्या वेगळ्या पद्धतिने साजरा होणार असे प्रतिपादन बजरंग दलाचे राज सोनी यांनी केले.रामनवमी का साजरी करावी त्याचे महत्व काय हे समितिचे उपाध्यक्ष किरण टिभे यांनी आपल्या वक्तव्यात सांगितले.यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील,नगरसेवक महेंद्र दुसाने,विशाल सांगळे,किरण टिभे,आयोजक राज सोनी,हरीष पाटील,अजित पाथरकर,निलेश देसाई,जिग्नेश पंचाल,हेमंत जाधव,संजय सोनवणे,जगदीश जयस्वाल,पंकज हिगु,अजय परदेशी,मनोज अग्रवाल,रजु अग्रवाल,घनशाम परमार,अनिल दुसाने,आदी उपस्थित होते.यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष भरत गावीत,तहसिलदार मंदार कुलकर्णी,नगराध्यक्ष हेमलता पाटील,किरण टिभे,राज सोनी,यांनी मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिवशाहीर सुनिल पवार यांनी केले तर आभार प्रशात ठाकरे यांनी मानले.या प्रसंगी श्रीरामोत्सव साठी कार्यालय उपलब्ध करुन दिल्या बद्दल प्रविण पाटील यांचा सत्कार उपस्थित मान्यवराचा हस्ते करण्यात आला.