Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अखेर : लाभार्थ्यांची फसवणूक करणारा शाखा प्रबंधक अधिकारी आर. एस. भदाने निलंबित

team by team
March 29, 2022
in क्राईम
0
अखेर : लाभार्थ्यांची फसवणूक करणारा शाखा प्रबंधक अधिकारी आर. एस. भदाने निलंबित

नंदुरबार | प्रतिनिधी
शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ कार्यालय नंदुरबार अंतर्गत वैयक्तिक कर्ज लाभार्थ्यांची गेल्या दोन वर्षापासून शाखा प्रबंधक अधिकारी आर. एस. भदाने यांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रकल्प अधिकार्‍यांच्या माहितीनुसार शाखा प्रबंधक आर. एस. भदाने यांना निलंबित केल्याची माहिती दिली आहे.


शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ कार्यालयात नवापूर तालुक्यातील ११५ लाभार्थ्यांनी किराणा दुकान, गॅरेज, शेतीविषयक आदी व्यवसायांसाठी १ ऑगस्ट २०२० रोजी अर्ज सादर केले होते. गेल्या दोन वर्षात संबंधित अधिकारी आर. एस. भदाने यांनी अर्जाबाबत प्रोजेक्ट रिपोर्ट व आदी सर्व कागदपत्रे लाभार्थ्यांकडून घेतली, मात्र लाभ दिलेला नाही. सदर योजने बद्दल विचारले असता अधिकार्‍यांकडून नेहमी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. याबाबत आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मीनल करणवाल यांना विचारले असता संबंधित अधिकारी आर एस भदाने निलंबित झाले असून दुसर्‍या अधिकार्‍यांना कार्यभार सोपवल्या नंतर याबाबत अधिक माहिती दिली जाईल असे सांगण्यात आले. मात्र आर.एस. भदाने यांना कोणत्या कारणावरून निलंबित केले याबाबतही स्पष्ट बोलण्यास मीनल करणवाल यांनी नकार दिला.
गेल्या दोन वर्षापासून या योजनेसाठी अर्ज सादर करणारे उच्च शिक्षित बेरोजगार असून आम्हाला योजनेचा लाभ कधी व कसा मिळेल याबाबत स्पष्ट उत्तर द्यावे असे प्रकल्प अधिकारी मीनल करणवाल यांना विचारले असता मी शाश्‍वती देऊ शकत नाही असे उत्तर त्यांनी दिले. त्यामुळे शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळामध्ये चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित होत आहे.
लाभार्थ्यांनी याबाबत शबरी वित्त विकास महामंडळ कार्यालयाला देखील तपास केला असता कार्यालयाला कुलूप आढळून आले. तसेच संबंधित अधिकारी निलंबित झाले असून तुषार वाघ यांच्याकडे कार्यभार सोपविण्यात आल्याची माहिती दिली आहे. परंतु ते धुळे येथे मीटिंग निमित्त गेल्यामुळे पर्याप्त माहिती मिळू शकली नाही.
गेल्या दोन वर्षात लाभार्थ्यांचे अर्ज सादर करण्या पासून या योजनेचा तपास करण्यासाठी जवळपास वैयक्तिक दहा हजार रुपये खर्च झाले असून संबंधित विभागाने लाभ न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा प्रकल्पाअंतर्गत शबरी आदिवासी वित्त विकास विभागाकडे जवळपास ५७ लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले होते त्यांना कर्जाचे वाटप करून लाभ देण्यात आला आहे. मात्र नंदुरबार प्रकल्पातील शहादा, नंदुरबार, नवापूर तालुक्यातील असंख्य लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यामुळे गेल्या दोन वर्षात संबंधित अधिकारी आर. एस. भदाने यांनी काय काळाबाजार केला व त्यांच्यावर निलंबनाची कारवाई का करण्यात आली याबाबत प्रकल्प अधिकारी मीनल करणवाल यांनी बोलण्यास नकार दिला असला तरी आर. एस. भदाने यांच्याद्वारे शबरी आदिवासी वित्त विकास विभागात मोठा भ्रष्टाचार केला असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच कर्जासाठी अर्ज सादर करणार्‍याकडून देखील पैसे उकळल्याची माहिती समोर येत आहे.विशेष म्हणजे शबरी आदिवासी वित्त विभाग कार्यालयाच्या फलकावर वैयक्तिक कर्ज लाभार्थ्यांसाठी योजना उपलब्ध नसल्याचे सूचना लावण्यात आली आहे. तसेच निधी परत गेल्याच्या देखील बोलले जात आहे त्यामुळे मार्च महिना पूर्ण न होताच निधी परत कसा गेला असा सवालही लाभार्थ्यांनी उपस्थित केला आहे याबाबत जोपर्यंत योग्य उत्तर मिळत नाही तोपर्यंत लढा सुरू राहील तसेच उद्या प्रकल्प कार्यालयावर आंदोलनाचा इशारा शबरी आदिवासी वित्त विकास विभागाला अर्ज सादर करणार यांनी दिला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

सोलर होम लाईट सिस्टमसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

लोकसेवा आयोग संयुक्त पुर्व परीक्षा-2021 परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

Next Post
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ३ एप्रिल रोजी गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा

लोकसेवा आयोग संयुक्त पुर्व परीक्षा-2021 परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add